खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी श्रीरामाच्या प्रतिमेची बनवली शाल.

Ahmednagar Breaking News
0

खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी श्रीरामाच्या प्रतिमेची बनवली शाल.

नगर,प्रतिनिधी.(14.फेब्रुवारी.) : खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी स्वतः सर्च करून, दर्जेदार वस्त्र आणि त्यावर चांगल्या प्रतीची प्रिंट असलेल्या श्रीरामाच्या प्रतिमेची शाल तेलंगणा राज्यातून तयार करून घेतली आहे. भारतात होत असलेल्या जागतिक श्रीराम मंदिराच्या सन्मानासाठी श्रीरामाच्या प्रतिमेची शाल खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी कार्यक्रमात प्रतिष्ठित नागरिकांच्या सन्मानासाठी,कार्यकर्त्यांच्या शुभकार्यासाठी, वाढदिवसानिमित्त त्यांच्या सत्कारासाठी या शालचा वापर करण्यात येणार आहे.शालेवर श्रीरामांची प्रतिमा असल्याने नागरिक सन्मानपूर्वक सदुपयोग करतील म्हणून ही शाल बनविण्यात आली आहे.

श्री.गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त खा.डॉ.सुजय विखे पाटील नवले नगर गुलमोहर रोड येथील श्री गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी आले होते.त्यांच्यासोबत भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,निखिल वारे, अमित गटणे आणि काही कार्यकर्ते होते. प्रकटदिनाचे दिवशी एका कार्यकर्त्याचा वाढदिवसानिमित्त ही पहिली शाल देऊन सन्मान करण्याताना खुप आनंद होत आहे, असे खा.सुजय विखे पाटील म्हणाले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top