श्री.गजानन महाराज मंदिरात प्रकटदिनानिमित्त पारायणाची सुरुवात.
नगर,प्रतिनिधी.(09. फेब्रुवारी.) : श्री.गजानन महाराज मंदिर, नवले नगर,गुलमोहर रोड येथे सालाबाद प्रमाणे प्रकट दिनानिमित्त आज पारायणाची सुरुवात झाली आहे.हे पारायण 9,10,11 असे तीन दिवस रोज सकाळी 10.30 ते 12.30 वाजेपर्यंत चालणार आहे.दरवर्षीपेक्षा यावर्षी पारायणासाठी भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद. मागील दोन वर्ष कोरोना मुळे कार्यक्रम होऊ न शकल्यामुळे यावर्षी भाविकांनी मोठ्या प्रमाणात पारायणासाठी प्रतिसाद दिला.
प्रकटदिन असल्याने काल संध्याकाळ पासून मंदिराची आणि मंदिर परिसराची कार्यकर्त्यांनी धुवून साफसफाई करण्यास सुरुवात केली.त्यामुळे मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले. परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी सढळ हाताने मदत करत आहेत. 13 फेब्रुवारी रोजी प्रकटदिन आहे.पहाटे सहा वाजता मूर्तीचा रुद्राभिषेक करण्यात येईल.सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत पालखीची भव्य मिरवणूक परिसरातून काढण्यात येईल. महाआरती दुपारी बारा वाजता सुरू करण्यात येईल. तरी पालखी मिरवणुकीच्या मार्गावर परिसरातील नागरिकांनी स्वच्छता करून सडा व रांगोळी काढण्याचे आवाहन नवलेनगर रहिवासी सेवा संस्था ट्रस्ट यांच्यावतीने करण्यात आले आहे. दुपारी 12:30 पासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा.मंदिर रात्री 10:30 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असणार आहे.