विळद येथील जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत.

Ahmednagar Breaking News
0

विळद येथील जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत.


नगर, प्रतिनिधी. (20. फेब्रुवारी.) : सोमवार दि.२०/०२/२०२३ रोजी शहर पाणी पुरवठा योजनेवरील विळद जलशुध्दीकरण केंद्र येथील २५०० केव्हीए ट्रान्सफार्मर मध्ये बिघाड झाल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाले बाबत कळविण्यांत येते की, शहर पाणी पुरवठा योजनेवरील विळद जलशुध्दीकरण केंद्र येथील अहमदनगर महानगरपालिकेच्या २५०० केव्हीए ट्रान्सफार्मर मध्ये सोमवार दि. २०/०२/२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता बिघाड झाल्यामुळे पाणी उपसा पूर्णपणे बंद झालेला आहे. अहमदनगर महानगरपालिकेमार्फत ट्रान्सफार्मर दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आलेले आहे. काम पूर्ण झालेनंतर टप्याटप्याने पंप चालू करून पाणी उपसा पूर्ववत करण्यात येईल. दुरूस्ती कालावधी दरम्यान शहरात पाणी येऊ शकणार नाही. त्यामुळे शहर वितरण व्यवस्थेच्या पाण्याच्या टाक्या निर्धारित वेळेत भरणे शक्य होणार नाही. पाणी उपसा बंद राहिल्याने आज दि. २०/०२/२०२३ रोजी होणारा सारसनगर, बुरुडगाव रोड भागातील पाणी पुरवठा मंगळवार दि. २१/०२/ २०२३ रोजी सकाळी करण्यात येईल. तद्नंतर रोटेशन नुसार स्टेशन रोड, आगरकर मळा, विनायक नगर,कायनेटीक चौक परिसर, लक्ष्मी कृपा हाउसिंग सोसायटी, प्रियंका कॉलनी, इत्यादी भागास होणारा पाणी पुरवठा करण्यात येईल.तसेच दि २१/०२/२०२३  रोजी होणारा पाणी पुरवठा शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट, रामचंद्रखुंट,झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको इत्यादी भागात पाणी पुरवठा बुधवार दि. २२/०२/२०२३ रोजी नेहमीच्या वेळेत करण्यात येईल.परिणामी बुधवार दि. २२/०२/ २०२३ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागाचा म्हणजेच तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, माणिकचौक, आनंदी बाजार, नवी पेठ, कापड बाजार इत्यादी भागास पाणी पुरवठा गुरूवार दि. २३/०२/२०२३ उशिराने व कमी दाबाने होणार आहे.

तसेच मुकुंदनगर, लक्ष्मीनगर, अर्बन बँक कॉलनी, निर्मलनगर, सुर्यनगर, शिवाजीगर इत्यादी उपनगरास एक दिवस उशिराने पाणी पुरवठा होईल.

तरी नागरीकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top