टाईनी - टॉट्स नर्सरी स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात साजरा.

Ahmednagar Breaking News
0

टाईनी - टॉट्स नर्सरी स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात साजरा.

नगर, प्रतिनिधी.(27.फेब्रुवारी.) : सावेडी उपनगरातील माऊली संकुल येथे कार्यक्रमाची सुरुवात डॉ. फुंदे, डॉ. राकेश गांधी, प्रा. विजय कांडेकर,प्रा. नॅन्सी कौल, सौ, गायकवाड मॅडम, सौ. कालिंदी पवार, मल्लिकार्जुन सर, निकम सर या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. चिमुकल्यांनी विविध वेशभूषा परिधान करून विविध गाण्यांवर डान्स करून उपस्थितांची मने जिंकली.नर्सरीच्या मुलांसाठी त्यांचे आवडते छोटे छोटे कार्टून कॅरेक्टर चे गाणे आणि त्यातूनही खूप मोठ मोठे संदेश पहावयास मिळाले.जुन्या परंपरा मधून भ्रष्टाचार निर्मूलन, कोकण दर्शन,गुजरातचा गरबा,जवानांची मस्ती,खंडोबाचे दर्शन,विठ्ठलाचे पूजन, शिवाजी महाराज अशी वेगवेगळी गाणी सादर करण्यात आली.कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांची उपस्थिती प्रार्थनीय होती.कार्यक्रम पार पाडण्यासाठी नर्सरी स्कूलच्या शिक्षकांचे आणि मदतनीस यांचे सहकार्य लाभले.

इतक्या लहान वयात टाईनी टॉट्स मधील विद्यार्थ्यांनी इतके सुंदर डान्स केले. कार्यक्रम संपूर्ण होईपर्यंत विद्यार्थी शांत बसून शिस्तीत कार्यक्रमाचा आनंद घेत होते. ही सर्व बाब लक्षात घेऊनडॉ. फुंदे यांनी खुद्द टाईनी टॉट्सच्या प्रिंसिपल सौ. मीरा पाटील आणि सर्व विद्यार्थ्यांचे आवडते पाटील अंकल यांना विशेष धन्यवाद पर पत्र लिहून पाठविले.त्यात त्यांचे खूप खूप आभार असे म्हणून त्या पालकांनी सांगितले की शाळा हे अगदी लोकांसाठी व्यवसाय केंद्र झाले असताना तुम्ही ते फक्त आवड म्हणून आणि एक संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी झटताय त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

 तसेच प्राध्यापक विजय कांडके यांनी ही शाळा एक विठोबा रुक्माईचे मंदिर आहे असे म्हटले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top