अहमदनगर जिल्ह्यात वेठबिगारी निर्मूलन आणि बालकामगार शोधमोहीम.
नगर,प्रतिनिधी.(03. फेब्रुवारी.) : दि३०/०१/२०२३ ते दि.१५/०२/२०२३ या कालावधीत अहमदनगर जिल्ह्यात वेठबिगारी निर्मुलन ही शोध मोहिम राबविण्यात येत असुन सदर मोहिमे दरम्यान आज दि. ०३/०२/२०२३ रोजी वेठबिगार निर्मुलनाकरीता नेमलेल्या पथकाने अहमदनगर परिसरातील नगर तालुका पोस्टे हद्दीतील देऊळगाव सिद्धी ता.नगर जि.अहमदनगर येथील पियुष शुगर अँन्ड पावर लिमिटेड साखरकारखाना,देऊळगाव सिद्धी ता.नगर येथे रेड केली असता तेथील जनरल मॅनेजर अंबादास लक्ष्मण मोरे वय ६२ वर्षे रा. वाळकी ता. नगर यांचेशी व तेथील कामगार यांचेशी चर्चा केली असता तेथील मँनेंजर अंबादास मोरे यांनी माहीती दिली की, सदर साखर कारखाण्यावर एकुण २४२ कामगार असुन त्यात २१२ पुरुष व ३० महिला कामगार असुन ते तिन शिप्ट मध्ये काम करतात. सर्व कामगार हे अहमदनगर जिल्ह्यातील असुन सर्व सज्ञान आहे. सदर ठिकाणी वेठबिगार व बालमजुर संबधीची माहीती मजुरांकडुन घेतली असता सदर ठिकाणी कोणीही वेठबिगार अगर बालमजूर नाही असे समक्ष कळविले.तसेच संकेत तबाजी कार्ले (सहाय्यक कामगार आयुक्त प्रतिनिधी) यांना मँनेजर अंबादास लक्ष्मण मोरे वय ६२ वर्षे रा. वाळकी ता.नगर यांचेकडुन साखर कारखाणा व्यवसायात १८ वर्षे खालील कोणीही बालक अगर वेठबिगार कामगार काम करत नाही तसंच भविष्यातही कामावर ठेवणार नाही याबाबतचे हमीपत्र लिहून दिले. सदर ठिकाणी सज्ञान कामगार असुन तेथे कोणीही वेठविगार अथवा बालमजुर नसल्याचे दिसुन आले तेथे वेठबिगारी निर्मुलनाकरीता तेथील कामगारांनासविस्तर माहीती सांगुन त्यांचे प्रबोधन केले आहे.
सदरची मोहिम मा.पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भिमराव नंदूरकर, पोसई भैय्यासाहेब देशमुख, सफो/क्षिरसागर, मपोकॉ /१३६५ सी. टी. रांधवन, मपोकॉ/ १७७० व्ही. वाय. सकट, चापोकॉ / २६७३ एस.एस.काळे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, अहमदनगर व सोबत. कामगार विभागाचे एक प्रतिनिधी हे राबवित आहेत.