मतदार संघात मोफत वीज ,मोफत पाणी देणार.- खा.डॉ.सुजय विखे पाटील.
पाथर्डी,विशेष प्रतिनिधी. (04.फेब्रुवारी.) : राज्यात सत्तातंर झाले आणि आपले सरकार आले,अवघ्या तीन महिन्यांत रखडलेल्या सर्व प्रकल्पांना निधी देऊन पूर्ण करणार आहोत असा विश्वास खा. डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त करून आपल्या मतदारसंघात शेतकऱ्यास मोफत वीज आणि पाणी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पाथर्डी येथे मीरी तिसगांवसह 43 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले होते आणि भाजपा जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, राहुल राजळे, भाजप तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, माजी नगराध्यक्ष अभयकाका आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
मागील अडीच वर्ष मविआ सरकार च्या काळात जिल्ह्यात एक फुटकी कवडीचा निधी आला नाही आणि विरोधक हे भूमिपूजन समारंभ करण्याचे ठरवत आहे, यांना नैतिक आधिकार आहे का ? असा सवाल उपस्थित करून या भागात रस्त्याची जी कामं झाली त्याचे श्रेय फक्त भाजपचे आहे असे खासदार विखे यांनी ठणकावून सांगितले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या निवडणुकीत माता भगिनीस आश्वासन दिले होते की हर घर नल, त्यानुसारच जल जिवन मिशन अभियान राबवून आज गावोगावी ह्या योजनेचे काम सुरू आहे. मिरी तिसगांव व इतर 43 गावे प्रादेशिक योजनेंतर्गत आपल्या मायमाऊलीस याचा लाभ होणार आहे. या योजनेसाठी 154.47 कोटी रूपये मंजूर केले असून लवकरच ही योजना कार्यान्वित होईल आणि आपल्या माता भगिनिंची पाण्याची ओढाताण थांबेल. एवढेच नाहीतर या योजनेसाठी लागणारे वीज बील देखील पूर्ण माफ होणार आहे. या शिवाय या भागातील विविध पाणीपुरवठा योजनेचे वीज बील देखील माफ करणार आहोत. त्यामुळे या भागात शेतकऱ्यांना मोफत पाणी आणि वीज देणार असल्याचे यावेळी खा. डॉ.सुजय विखे यांनी सांगितले.
आज आपण जिवंत आहोत ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच, कोरोना काळात मोदींनी सर्वांसाठीच मोफत लसीकरण कार्यक्रम हाती घेतला, त्याचा परिणाम आपण या महामारीतून सहीसलामत बाहेर आलो असे सांगून मोदींच्या या दूरदृष्टीमुळे आपला देश या संकटकातून बाहेर आला, याच महामारीने अनेक देशांची वाताहत झालेली आपण पाहिली आहे. मोदींचे नेतृत्व हे सर्वसमावेशक असेच असून देशाचा सर्वांगीण विकास साधणारे आहे. आता तर जगाने ही मोदींचे नेतृत्व मान्य केल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा त्यांनाच आपला मतदानरूपी पाठिंबा द्यायचा आहे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
गेल्या तीन महिन्यांत आपण राज्याच्या कारभार देखील पाहत आहात, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार देखील तितक्याच सक्षमपणे काम करत आहे. हे सरकार या दिवशी पडणार, आमदार नाराज अशा काही बिनकामाचे लोक वावड्या उठवत आहेत, मात्र आपणास आवर्जून सांगतो हे सरकार संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करणार, आपल्या सर्वांच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार आहे एवढेच नाहीतर तर आपल्या जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात न भूतो न भविष्यती असे काम करून दाखवणार असे वचन या प्रसंगी खासदार विखेंनी उपस्थितांना दिले. कोल्हारघाट रस्त्याचे रुंदीकरण आणि खडीकरण केल्याशिवाय आपण या भागात येणार नाही असा निर्धार ही यावेळी त्यांनी केला.
यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी सांगितले की राज्यात युती शासन असताना या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस मान्यता मिळाली होती मात्र ज्यांना या योजने विषयी काहीच माहिती नाही ते भूमिपूजन समारंभ घेत आहेत असा विरोधकांना टोला लगावत मागील अडीच वर्षांत या योजनेसाठी ऐक रूपायाही अनुदान मिळाले नाही असे सांगितले. एवढेच नाहीतर या मतदारसंघात कुठलेही विकासकामा करिता साधा प्रस्ताव देखील दिला नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघासाठी अनेक योजना मंजूर केल्या असून पालकमंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील पुढील काळात अनेक योजना ह्या सुरू करावयाच्या असल्याचे या प्रसंगी सांगितले.
याप्रसंगी भाजपा अध्यक्ष अरूण मुंडे ,पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष आटकरे यांची समयोचित भाषणे झाली.
प्रारंभी मीरी तिसगांव व 43 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन खा. डॉ.सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते झाले. तसेच चिंचोडी गावासाठी कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडीचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात ग्रामपंचायतीच्या वतीने नऊ विविध योजनेचा समावेश असलेले मोफत कार्डचे वितरण गावातील महिलांना करण्यात आले.
कार्यक्रमास पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह पदाधिकारी,विविध विभागाचे आधिकारी यांची उपस्थिती होती.