महिला दिनानिमित्त 147 महिलांची मोफत नेत्र तपासणी.- नेत्रदूत जालिंदर बोरुडे.

Ahmednagar Breaking News
0

जागतिक महिला दिनानिमित्त श्री.दंतेश्वरी माता महिला मंडळ व श्री राम भजनी मंडळाच्यावतीने 147 महिलांची मोफत नेत्र तपासणी.

नगर, प्रतिनिधी.(06.मार्च.) : जागतिक महिला दिनाचे औचित साधून भिंगार येथील श्री दंतेश्वरी माता महिला मंडळ व श्री राम भजनी मंडळ, हलबा समाज यांच्यावतीने चौंडेश्वरी मंदिर, सरपण गल्ली  येथे मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.फिनिक्स फौंडेशनच्या सहकार्याने आयोजित या शिबीरात प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ.स्मिता पटारे यांनी महिलांची नेत्र तपासणी केली. याप्रसंगी जालिंदर बोरुडे, डॉ.सौ.भावना शेळके उपस्थित होत्या.

याप्रसंगी डॉ.स्मिता पटारे म्हणाले, आजची महिला विविध जबाबदार्या सांभाळतांना, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतांना दिसत आहे. त्यामुळे अनेक छोट-मोठ्या व्याधींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत आहार आणि व्यायामाबरोबरच नियमित आरोग्य तपासणी केली पाहिजे. आज महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी राबविलेला उपक्रम कौतुकास्पद असाच आहे. अशा मोफत शिबीराच्या माध्यमातून जनसेवेचे व्रत जोपासले जात असल्याचे सांगून महिलांनी आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, या विषयी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी जालिंदर बोरुडे म्हणाले, वाढत्या आरोग्य खर्चामुळे अनेकजण आपल्या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात,  त्याचे दुष्परिणाम भविष्यात मोठ्या प्रमाणात जाणवतात. यासाठी वेळीच उपचार होणे गरजेचे असते. आज महिला मंडळांच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबीराच्या माध्यमातून महिलांची तपासणी झाल्याने खर्या अर्थाने महिला दिन साजरा झाला आहे, असे सांगितले.

याप्रसंगी श्री राम भजनी मंडळाच्या प्रमुख डॉ.सौ.भावना शेळके यांनी महिलांना डोळ्यांची काळजी कशी घ्यायची व महिलांनी स्वतःची काळजी कशी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन केले व तसेच कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार प्रगट केले.

डॉ.स्मिता पटारे आय क्लिनिक व फिनिक्स फौंडेशनच्या सहकार्याने आयोजित या शिबीरात 147 महिलांची नेत्र तपासणी करण्यात आली.

श्रीराम भजनी मंडळ व श्री दंतेश्वरी माता महिला मंडळ हलबा समाज भिंगार या दोन्ही ग्रुपच्या महिलांनी या कार्यक्रमासाठी आठ दिवस अतिशय परिश्रम घेऊन या कार्यक्रमाची तयारी केली. व समाज उपयोगी अशा स्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन केले.

-

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top