खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून वाबोरी चारी प्रकल्पाच्या माध्यमातून साठ गावांचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू.

Ahmednagar Breaking News
0

खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून वाबोरी चारी प्रकल्पाच्या माध्यमातून साठ गावांचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू.

अहमदनगर,प्रतिनिधि.(01.मार्च.) : पाथर्डी आणि राहुरी तालुक्यातील साठ गावाचा पाणी पुरवठा दक्षिण नगरचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून पूर्ववत झाला असून वांबोरी येथील चारीतून सोडण्यात येणारया पाण्याचे थकित एकूण बील एक कोटी 41लाख रूपये विद्युत बीलात शासनाने 71 लाख रूपयाचे अनुदाना दिले आहे. शासनाच्या अनुदानामुळे राहिलेले 59 लाख रूपये वीज बील भरून आता या साठ गावातील शेतकऱ्यांना पाणी पुरवठा पूर्ववत होऊन शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

खा.डाॅ.सुजय विखे व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या कडे पाथर्डी व राहुरी तालुक्यातील शेतकरयांनी वांबोरी येथील चारीचे पाणी सोडण्या करिता थकीत असलेल्या एक कोटी 41 लाख रूपये वीज बीला बाबत मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने त्यांनी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर पाठपुरावा केला आणि राज्य सरकारने 46 लाख रूपये तर गोदावरी महामंडळाने 25 लाख रूपयाचे अनुदान या थकित वीज बीला करिता दिले असे 71 लाख रूपये अनुदान मिळून उर्वरित रक्कम जमा करून खंडित वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. यामुळे पाथर्डी तालुक्यातील चाळीस गावे तर राहुरी तालुक्यातील वीस गांवाना 102 तलावातील पाणी शेतीसाठी ऐन उन्हाळ्यात मिळणार आहे. 

दरम्यान या साठ गावातील शेतकरयांनी वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणी पुरवठा होत नव्हता, हातातोंडाशी आलेली पीके ही केवळ पाण्या अभावी जाणार होती मात्र खा.डाॅ.सुजय विखे पाटील व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या प्रयत्नाने ती वाचली म्हणून त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top