वारकऱ्यांशी संवाद साधून केंद्रीय राज्यमंत्र्या सोबत खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी फुगडी खेळली.

Ahmednagar Breaking News
0

नाथ षष्ठी निमित्ताने खा.विखे यांनी घेतले पैठण येथील संत एकनाथ समाधीचे दर्शन.

पैठण,प्रतिनिधी.(13. मार्च.) :  नगरचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी नाथ षष्ठीच्या निमित्ताने पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले,यावेळी नाथ षष्ठीच्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील आलेल्या अनेक भागातील दिंडिंना भेट देत वारकऱ्यांशी खा.सुजय विखे पा यांनी संवाद साधला, त्यांची विचारपूस करत त्यांच्या समवेत हरिनामात खासदार दंग झाले.

यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे देखील दर्शनासाठी आले असता त्यांच्या बरोबर फुगडी देखील खेळण्याचा आनंद लुटण्यात आला.दरम्यान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या फुगडी खेळल्याने वारकरी महिला आणि पुरूषात एक नवचैतन्य निर्माण होऊन वातावरण भक्तीमय झाले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top