महापशुधन एक्सपो २०२३ यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे. - खा.डाॅ.सुजय विखे पाटील.

Ahmednagar Breaking News
0

महापशुधन एक्सपो २०२३ यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे. - खा.डाॅ.सुजय विखे पाटील.

लोणी,प्रतिनिधी.(18.मार्च.) : शिर्डी येथे पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून आपले नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून देशातील सर्वात मोठे राष्ट्रीय स्तरावरील 'महापशुधन एक्सपो २०२३' चे आयोजन २४ ते २६ मार्च, २०२३ दरम्यान करण्यात आले आहे.संपूर्ण महाराष्ट्रासाठी मार्गदर्शन दिशादर्शक ठरणारे प्रदर्शन  प्रत्येक कार्यकर्त्यांनी  यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी केले.

शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर लोणी येथे  राहाता,संगमनेर,श्रीरामपूर आणि राहुरी येथील कार्यकत्याच्या उपस्थितीत  नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत खा.डाॅ.विखे पाटील यांनी प्रदर्शनाच्या संदर्भात तयारीचा आढावा घेवून तीन दिवस आयोजित केलेल्या कार्यक्रमाची  सविस्तर माहीती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिली. यावेळी विविध संस्थाचे पदाधिकारी आणि भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.  

प्रदर्शनाच्या संदर्भात माहिती देतांना डाॅ.विखे पाटील म्हणाले  म्हणाले की,  देशातील १३ राज्यातील पशुपक्ष्यांच्या  १५०० प्रजाती सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धनाचे महत्त्व पटवून देवून देशी गोवंशामध्ये अनुवंशिक सुधारणा घडवून आणणे, सुशिक्षित बेरोजगारांना पशुपालनाद्वारे स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यायोगे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे, दूध, मांस, अंडी उत्पादनास चालना देणे, जनावारांची उत्पादन क्षमता वाढवून उत्पादन खर्च कमी करणे, लिंग निश्चित केलेल्या विर्यमात्राचा कृत्रिम रेतन कार्यक्रमात वापर, वैरण उत्पादनास चालना देणे, मुरघास हायड्रोपोनिक अझोला तंत्रज्ञान यासारख्या विषयांबाबत पशुपालकांना प्रात्यक्षिकांसह या प्रदर्शनात तज्ज्ञांकडून होणारे मार्गदर्शन राज्यातून येणार्या पशुपालकांना उपयुक्त ठरेलच परंतू नगर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना मोठी पर्वणी ठरणार असल्याचे खा.डॉ विखे म्हणाले.

शास्त्रोक्त पध्दतीने पशुपालन करण्यासाठी आवश्यक यंत्रे उपकरणे तसेच पशुसंवर्धनाशी  निगडीत बाबीसाठीच्या उत्पादनाचे स्टाॅल सुमारे ४६ एकराच्या क्षेत्रामध्ये उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून यजमान पद हे शिर्डीकडे असल्याने  असल्याने प्रत्येक गावांतून महीला बचत गटांबरोबरचं इतरही महीला,शालेय विद्यार्थी यांच्यासाठी स्वतंत्र  नियोजन करण्यात आले असून यासाठी १०० बसची सुविधा पुरविण्यात येणार आहे. शिर्डी मतदारसंघासोबतचं राहाता,संगमनेर,राहुरी आणि श्रीरामपूर भागातील कार्यकर्त्यानी यासाठी गांव पातळीवर नियोजन करावे सकाळच्या सत्रात  विद्यार्थी आणि दुपारच्या सत्रात महीला असे नियोजन करतांनाच युवकांनी स्वयंसेवक म्हणून आपले योगदान द्यावे.जिल्ह्यातील  प्रत्येक कुंटुंबातील एकाने तरी 'महापशुधन एक्स्पो आणि यानिमित्ताने होणारा सास्कृतिक महोत्सव,महीला बचत गटांचे दालन बघावे  असे आवाहन करुन महापशुधन एक्स्पोचे उद्याटन मुख्यमंत्री  ना. एकनाथ शिंदे तर समारोप उपमुख्यमंञी ना.देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणार आहे.प्रत्येकांने यामध्ये सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा असे खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी शेवटी सांगितले.

  

 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top