🚴‍♀️🚴‍♀️नाशिक सायकलिस्टस फाउंडेशन आयोजित महिला सायकल प्रशिक्षण शिबिरास उदंड प्रतिसाद🚴‍♀️🚴‍♀️

Ahmednagar Breaking News
0

 🚴‍♀️🚴‍♀️नाशिक सायकलिस्टस फाउंडेशन आयोजित महिला सायकल प्रशिक्षण शिबिरास उदंड प्रतिसाद🚴‍♀️🚴‍♀️



नाशिक,प्रतिनिधी. (01. मार्च.) : 🚴‍♀️ या वर्षीचा महिला दिन महिलांनी आरोग्यदुत व पर्यावरण रक्षक होऊन साजरा करावा या अनुषंगाने नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनच्या वतीने खास करून महिलांसाठी ०१ मार्च ते ०८ मार्च या कालावधीत अनंत कान्हेरे मैदान ( गोल्फ क्लब ) येथे सकाळी ०७ ते ८.३० वाजता या वेळेत सायकल प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराचे उद्घाटन सौ. अनुराधा नडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

🚴‍♀️ अनेक महिलांना सायकल शिकण्याची इच्छा असते पण, काही जणींना सायकल चालवता येत नाही, काही जणींकडे सायकलच उपलब्ध नसते, काहींनी लहानपणी चालवली होती ,पण खूप दिवसानंतर सायकल हातातच घेतली नाही, काही महिलांना शिकण्याची इच्छा असूनही मार्गदर्शन करणारे कोणी नाही ,अशा अनेक बाबींमुळे महिला सायकलची आवड असूनही सायकल चालवण्यापासून  दूर असतात. ती फिट असली तर कुटुंब फिट राहील या अनुषंगाने , महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे वेळ द्यावा , या दृढ दृष्टिकोनातून हा आगळावेगळा उपक्रम नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनचे अध्यक्ष श्री किशोर माने यांच्या मार्गदर्शनाखाली  राबवण्यात येत आहे.

🚴‍♀️ उपस्थित महिलांना डॉ. मनिषा रौंदळ यांनी सायकल बद्दल सखोल माहिती दिली व सायकलवर कसे बसायचे, तोल कसा सांभाळायचा, पेडल कसे मारायचे याबद्दल मार्गदर्शन केले* .पहिल्याच दिवशी या उपक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला. काही महिलांनी साधारण तीस वर्षानंतर ,आज सायकल चालवायला मिळाली याचा आनंद व्यक्त केला. काही महिलांनी प्रथमच सायकल चालवली. अनेक महिलांचा आत्मविश्वास वाढला. *हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी  नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनचे खजिनदार श्री सुरेश डोंगरे, साधना दुसाने, सीमा घुगे, सुवर्णा देशमुख, शितल माने,अनिल फडके, डॉ. नितीन रौंदळ अथक परिश्रम घेत आहे.

🚴‍♀️ गोल्फ क्लब  मैदान येथील जॉगर्स क्लब, नगरसेवक सतीश बापू सोनवणे यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

🚴‍♀️ दि. 11 मार्च, शनिवार रोजी भव्य "महिला सायक्लोथॉन "नाशिक सायकलिस्टस फाउंडेशन च्या वतीने सकाळी ०७ वाजता अनंत कान्हेरे मैदान येथे आयोजित केली आहे.तरी सर्व महिलांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top