जालिंदर बोरुडे यांना ‘अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार’प्रदान.

Ahmednagar Breaking News
0

जालिंदर बोरुडे यांना ‘अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार’प्रदान.

पुरस्कार रुपाने त्यांचा सन्मान हा त्यांच्या कार्याची पावतीच. - डॉ.लक्ष्मण मतकर.

नगर, प्रतिनिधी. (26. मार्च.) : जय मल्हार सामाजिक, शैक्षणिक संस्थेच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे  यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी डॉ.लक्ष्मण मतकर, संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल जाडकर, प्रदीप भाऊ सरोदे गजानन तोहर नीलकंठ उल्हारे आदि उपस्थित होते. 

याप्रसंगी डॉ.लक्ष्मण  मतकर म्हणाले, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकर्तुत्वाने समाज हिताचे निर्णय घेऊन आपल्या प्रजेसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या. त्यांचे कार्य आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या नावाने पुरस्कार देऊन सामाजिक संस्थांच्या पदाधिकार्यांचा गौरव करुन त्यांचे कार्य अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला आहे. पुरस्कारप्राप्त जालिंदर बोरुडे यांचे आरोग्य क्षेत्रातील कार्य इतरांनाही प्रेरणादायी आहे. पुरस्कार रुपाने त्यांचा सन्मान हा त्यांच्या कार्याची पावतीच म्हणावी लागेल. अशा सामाजिक काम करणार्यांना प्रोत्साहन देणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य असल्याचे सांगितले. 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल जाडकर म्हणाले, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य पुढे सुरु ठेवण्याचा संस्थेच्यावतीने प्रयत्न केला जात आहे. त्याच अनुषांगाने सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करुन त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्याचा छोटसा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.

सत्कारास उत्तर देतांना जालिंदर बोरुडे म्हणाले, आज समाजाला नि:स्वार्थ कार्य करणार्यांची गरज आहे. सामाजिक कार्य करतांना एक आत्मिक समाधान लाभत असते. गोर-गरीबांना मोफत शिबीराच्या माध्यमातून आरोग्य सेवा तसेच नेत्र तपसाणी करुन त्यांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा प्रयत्न आहे. आजच्या पुरस्काराने आपणास प्रेरणा मिळणार असून, हे कार्य अधिक चांगल्या पद्धतीने सुरु राहण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप सरोदे यांनी केले तर गजानन तोहर यांनी आभार मानले. जालिंदर बोरुडे यांना ‘अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार’ मिळाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top