रसाळ नेत्रालय येथे काचबिंदू सप्ताह व महिला दिनाचे औचित्य साधून सवलतीच्या दरात संपूर्ण काचबिंदू तपासणी व लेझर शस्त्रक्रिया शिबिर.
नगर,प्रतिनिधी.(04.मार्च.) : डॉ. प्रकाश रसाळ यांचे रसाळ नेत्रालय येथे काचबिंदू सप्ताह व महिला दिनाचे औचित्य साधून सवलतीच्या दरात संपूर्ण काचबिंदू तपासणी व लेझर शस्त्रक्रिया शिबिर बुधवार,दि.08 मार्च 2023 रोजी,सकाळी 9.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत रसाळ नेत्रालय,पहिला मजला,कालिका प्राईड बिल्डिंग,लालटाकी,अहमदनगर येथे आयोजित करण्यात आले आहे.
शिबीरा अंतर्गत पुढील तपासण्या केल्या जातील.
🟣ओ. सी. टी. काच बिंदू तपासणी.( ग्लुकोमा प्रोटोकॉल.).
🟣दृष्टीचा परिघ तपासणी.( पेरीमेट्री.).
🟣अँगल्सची तपासणी.
🟣डोळ्याचा दाब मोजणे.(नॉन कॉन्टॅक्ट टोनोमेट्री.).
🟣काळ्या बाहुलीची जाडी मोजणे.( पॅकीमेट्री.).
🟣 डोळ्याच्या नसेची तपासणी.(ऑप्टिक डिस्क इव्हॅल्युएशन).
वरील सर्व तपासणी करण्यासाठी 5000/- रुपये लागत असतात परंतु शिबिर असल्याकारणाने सवलतीच्या दरात वरील सर्व तपासणीसाठी फक्त 2000/- रुपये आकारले जाईल,तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन रसाळ नेत्रालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.