राजकारणातील मित्रत्व जोपासाणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले. - ना. राधाकृष्ण विखे पाटील.

Ahmednagar Breaking News
0

राजकारणातील मित्रत्व जोपासाणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले. - ना. राधाकृष्ण विखे पाटील.

शिर्डी,प्रतिनिधी.(29 मार्च.) : भाजपाचे नेते आणि खासदार गिरीष बापट यांच्या निधनाने राजकारणातील मित्रत्व जोपासाणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले असल्याची भावना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील म्हणाले की, गेली अनेक वर्षे विधीमंडळात त्यांचा सहवास लाभला. विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना त्यावेळी बापट  साहेब संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम पाहायचे. पण राजकारणात फार कटूता येवू न देता संवादामुळे सभागृहातील निर्माण होणाऱ्या पेचप्रसंगावर मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती.

महानगरपालिका ते लोकसभा हा गिरीष बापट यांचा राजकीय प्रवास त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा होता. पुणे आणि गिरीष बापट हे एक अतूट नाते होते. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचे मोठे नूकसान झाले असून पक्षाच्या वाटचालीतील एक अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले गेल्याची संवेदना व्यक्त करून मंत्री विखे पाटील यांनी गिरीष बापट यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top