सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांना पितृशोक.

Ahmednagar Breaking News
0

सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांना पितृशोक.सुरेश बोज्जा (अण्णा ) कारभारी यांचे दुःखद निधन.

नगर, प्रतिनिधी. (30. मार्च.) : सुरेश रामय्या बोज्जा, कारभारी (वय - 72 वर्षे )यांचे पुणे येथील के ई एम हॉस्पिटल मध्ये अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले असून उद्या दिनांक 31 मार्च 2023 रोजी सकाळी 11.00 वा. त्यांची  राहत्या घरापासून (  सिमला कॉलोनी, पाईप लाईन रोड, भिस्तबाग, अहमदनगर )  अंत्ययात्रा निघणार आहे. अमरधाम नालेगाव येथे सकाळी 11.30 वाजता अंत्यविधी होणार आहे.

सुरेश रामय्या बोज्जा हे पदमशली समाजातील जेष्ठ नागरिक व पंच म्हणून काम केले असून पद्माशाली पंच कमिटी चे सहसचिव म्हणूनही काम केले आहे. ते कारभारी म्हणून परिचित होते. त्यांच्या मागे चार मुले व एक विवाहित मुलगी , सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांचे ते वडील असून मा. नगरसेविका सौ. वीणा बोज्जा यांचे ते सासरे होते. त्यांचे दुःखदनिधनामुळे पदमशली समाजातील जेष्ठ नागरिकाची व मार्गदर्शकाची मोठी पोकळी निर्माण झाली.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top