!! जय जगन्नाथ भगवान.!!
नाशिककरांनी अनुभवली योगेश टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून जगन्नाथ,पुरी, गंगासागर, पशुपतींनाथ अशी चारधाम यात्रा.
यात्रा कालावधी दिनांक 5 मार्च ते 22 मार्च 2023.
नाशिक, प्रतिनिधी. (23.मार्च.) : पुरीतील पवित्र समुद्र स्नान करुन चार धामातील पूर्वेकडील जगन्नाथ धाम भावा बहिणीच्या पवित्र नात्याला सन्मानाचे प्रतिक म्हणुन ओळखले जाते, त्या भगवान श्रीकृष्ण, बलराम, व सुभद्रा देवीच्या दर्शनाने पावन होऊन यात्रा प्रारंभ झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी च श्री जगन्नाथाच्या दर्शनाची साक्ष देण्यासाठी साक्षीगोपाल मंदिरात आलो, पुढे भुवनेश्वर येथील स्वयंभु महादेवाचे अति प्राचीन वास्तुकलेची साक्ष देणारे श्री लिंगराज दर्शन घेतले.जगातील एकमेव असे जित्या जागत्या श्री सुर्य देवाचे कोणार्कचे सुर्यमंदिर म्हणजे वास्तुशिल्पाचा एक अनोखा संगम. एकाच पाषाणातील नवग्रहांच्या सुबक मूर्ती माणसाला नतमस्तक करतात.
कलकत्त्याला आल्यावर बेलूरमठ म्हणजे आधुनिक शिल्पकलेचा एक आदर्श नमुना.अतिभव्य परिसर, शेजारी विशाल नदी काठ, स्वामी विवेकानंद यांना जिथे शारदा मातेने दर्शन दिले ते ठिकाण, स्वामी चे व श्री शारदा मातेचे सुबक मंदिर.
तेथूनच पुढे श्री दक्षिनेश्वर मंदिर येथील कालीका मातेचे भव्य प्रांगणात खूपच सुरेख मूर्तीतील दर्शन मनाला भाऊन गेले. त्या समोरच 12 ज्योतिर्लिंगाची मंदिर ,सुंदर व स्वच्छ असा परिसर पाठीमागे अथांग जलाशय सारे काही मनमोहक व मनाला आनंद देणारे वातावरण.जुन्या व ग्रामीण भागातील प्राचीन काली मातेचे दर्शनाचा लाभ मिळाला, पण तेथील पंड्याच्या लोभस वृत्ती चा अनुभव आला.
दुसऱ्या दिवशी पहाटेच गंगासागर साठी प्रवास सुरू केला.स्टिमर बोट ने बंगालच्या उपसागरातील दुसऱ्या किनाऱ्यावर प्रवास करून गंगासागर किनारी आलोत, जिथे गंगा सागराला मिळते ते हे ठिकाण, हिंदु धर्मातील एक धार्मिक तीर्थक्षेत्र. इथल्या स्नानालाही खुप महत्त्व दिले जाते.ते करून श्री कपीलेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन परत स्टिमर बोटीने बसेस जवळ आलो व पुढे कलकत्त्याला मुक्कामी पोहोचलो.
दुसऱ्या दिवशी कलकत्ता ते गया प्रवास करून बोधगया येथे मुक्कामी आलो.
सकाळी उठून पितृगया येथे गंगेच्या किनारी पिंडदान करून बोधगया येथील गौतम बुद्ध यांना ज्या वटवृक्षाच्या खाली जेथे ज्ञान प्राप्त झाले ते पवित्र ठिकाणचे दर्शन घेतले, तेथे गौतम बुद्ध यांचे सुबक सोनेरी मूर्तीतील दर्शन मनाला शांती देऊन जाते.रात्री काशी येथे मुक्कामी आलो.
सकाळी गंगेच्या किनारी गंगापूजान व काशी विश्वेश्वराला अभिषेक पुजा आटोपून होडीने काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी आलो. भव्य प्रांगणात सुंदर आकर्षक मंदीरातील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले वदुसऱ्या दिवशी पुढे प्रयाग साठी प्रयाण केले. प्रयाग येथे गंगा, यमुना व अदृष्य सरस्वती संगमावर स्नान करून लग्न सोहळा व वेणीदानाचा कार्यक्रम झाला.व अयोध्या साठी प्रवास सुरू झाला, फैजाबाद येथे मुक्कामी उतरलो.
सकाळी अयोध्या येथील जानकी घाट राम दरबार, दशरथ महल, बिर्ला मंदिर, रामजन्मभूमी, हनुमान गढी व शरयु नदी दर्शन घेऊन सौनाली बॉर्डर साठी रवाना झालो.
दुसऱ्या दिवशी सकाळी नेपाळमध्ये खड्ड्यामय रस्त्यावरिल प्रवासाचा त्रास हिमालयाच्या पर्वत रांगेतील निसर्ग सौंदर्यात रममाण होऊन विसरून गेलो. डोंगर दऱ्यातुन क्षणा क्षणाला धडधड वाढविणारा, उंची या शब्दाला खराखुरा अर्थ या पर्वत राशीतून फिरतांना उमगला. हिरव्यागार वृक्ष वेलींनी झाकळलेल्या दऱ्या व ढगात शिरलेली उत्तुंग शिखरे , सोबतीला झुळझुळ वाहणाऱ्या गंडकी नदीचा किनार असा काठमांडू साठी हिमालयाच्या कुशीतला प्रवास करत रात्री मुक्कामी आलोय.
अतिशय सुरेख असे पोलुशन फ्री कमी तापमान सकाळच्या गारव्यातील पशुपतीनाथाच्या दर्शनासाठी मन उत्तेजित करीत होते. आपल्या मंदिरातील पंड्या/भटजी यांचा लोभी अनुभव मात्र इथल्या कुठल्याही मंदिरात दिसला नाही. त्यामुळे पशुपतीनाथाचे अगदी व्यवस्थित व शांतपणे दर्शन झाले. या यात्रेतला दर्शनाचा सगळ्यात चांगला अनुभव आल्याने मन समाधानी झाले. पिंडीच्या चारही दिशेला चार शिव मुखे व पाचवे मुख पिंडीच्या वरती अशी अतिशय सुंदर व सुबक पशुपतिनाथाची मूर्ती मनाच्या गाभाऱ्यात स्थानापन्न होत होती.ऊंच लाकडी दरवाजावर भगवान श्री शंकराची विलोभनीय कोरीव काम केलेली निळसर मुर्ती माणसाला नतमस्तक होण्यास भाग पाडत होती.उंचच उंच लाकडी कोरीव नक्षीकाम केलेले खांब व त्यावर विविध देव देवतांच्या सोनेरी रंगातील कोरलेल्या लीलया संगणकीय टेकनोलॉजी ला लाजविणाऱ्या वाटत होत्या.प्रवेश द्वारातून आत गेल्यावर समोरच महाकाय सोनेरी नंदीचे दर्शन घडत होते. मंदिराचा परिसर स्वच्छ व सुंदर होता, चारही दरवाज्यातून पशुपतींनाथाचे दर्शन घेता येत होते. मंदिर परिसरात अनेक देव देवतांची तसेच बाराही ज्योतिर्लिंगाची मंदिरे आहेत. श्री जगन्नाथाचेही सुबक मंदिर आहे.नंतर श्री पार्वती मातेचा पार्श्वभाग जिथे पडला त्या ठिकाणी शक्तीपीठ श्री गृहेश्वरी माता मंदिर परिसरात दर्शनासाठी गेलो.अती प्राचीन व कला कौशल्याने सजलेल्या मंदिरात पार्वती देवीचे दर्शन घेतले.ईथली सर्वच मंदिरे लाकडी कलाकुसरीने सुरेख बनवली आहेत.शहरात फेरफटका मारला असतांना जागोजागी भव्य व प्राचीन काळ्या व लाल लाकडातील मंदिरे बघायला मिळतात.नेपाळी वस्तु च्या खरेदीसाठी काठमांडू योग्य शहर अनुभवास आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी स्वयंभु मंदिर बघितले, श्री विष्णु भगवान यांची शेषनागा वरील शय्या अवस्थेतील हे मंदिर पूर्ण हिंदुस्तानात प्रसिद्ध व महत्वाचे मानले जाते. श्री विष्णूंचे मोहक निद्रा स्थितीतील रूप मनाला एक वेगळीच अनुभती देऊन जाते.बौद्ध स्तुप व भगवान श्री गौतम बुद्ध व त्यांची माता महामाया देवी यांच्या सुवर्ण मुर्त्या अति विशाल व अतिशय मनमोहक बघायला मिळतात.
काठमांडू हुन निघुन पोखरा येथे मुक्कामी आलो
दुसऱ्या दिवशी विंधवासिनी देवीचे सुंदर मंदिर आहे, त्या मंदिरातच शिव , राधाकृष्ण, रामसीता, विष्णु लक्ष्मी, अशी अनेक आकर्षक कलाकुसरीची मंदिरे आहेत.नंतर डेव्हिस फॉल,शिवगुफा येथे दर्शनासाठी गेलोत.शिवगुफा येथे अतिशय खोल जमिनीच्या शंभर फुट खाली धबधबा व शिव मंदिर आहे, अतिशय विलोभनीय असे दृश्य क्षणा क्षणाला उत्कंठा वाढविणारे कसेतरी सावरत तेथपर्यंत पोहोचणारे पण या कष्टप्रद त्रासाला न्याय देणारे विहंगमय दृश्य पाहून समाधान मिळते. मंदिर परिसरात भगवान विष्णू ची शेषधारी निद्रा मूर्ती व शेषनागा ची स्वतंत्र मूर्ती मनाला आनंद देऊन जातात.फेवा लेक या शहराच्या मध्यवर्ती भागात असून सौंदर्यात भर घालतो. बोटिंग करून बेटावरील स्थानिक देवीला दर्शनासाठी जात येते.
पोखरा मुक्कामी होऊन दुसऱ्या दिवशी मनोकामना देवीच्या दर्शनासाठी रवाना झालोत, रोप वे ने जवळपास 3 डोंगर चढून मनोकामना देवी चे मंदिर आहे. डोगर दऱ्या तुन वाहणारी नदी, उंचच उंच शिखर, वृक्ष रोप वे मधील प्रवास एक वेगळाच आनंद देऊन जातात.
देवीचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली व सौनाली बॉर्डर येथे आलो, येथील सामान घेऊन गोरखपूर कडे रवाना झालो, गोरखपूर येथील श्री गोरखनाथ दर्शन घेऊन रेल्वे स्टेशन ला येऊन ट्रेन मध्ये बसलो आणि आप आपल्या गावी उतरलो.