शेतकऱ्यांच्या हिताचे नसलेले सर्व कायदे रद्द करू. - खा.डाॅ.सुजय विखे पाटील.
श्रीगोंदा,प्रतिनिधि.(04. मार्च.) : शेतकऱ्याच्या हितास जर कुठल्या कायद्याने बाधा पोहचत असेल तर असे कायदे निश्चितपणांनी रद्द करून शेतकऱ्यांस दिलासा देऊ असे जाहीर भाषणातून दक्षिण नगरचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी सांगून कुकडीच्या भूसंपादनाचे राहिलेले पैसे लवकरच देऊ असे सांगितले. ते श्रीगोंदा येथील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते. या शुभारंभ कार्यक्रमास माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी प्रतापभैय्या पाचपुते, बाळासाहेब नाहटा, रमेश गिररमकर, अण्णासाहेब शेलार, सुरेशराव रसाळ , पंचशिलाताई गिरमकर,संदीप नागवडे, प्रतिभाताई झिटे, मिलिंद दरेकर,विजय शेंडे ,अनिल ढवाळ, लक्ष्मण रसाळ, सुवर्णाताई पाचपुते, बाळासाहेब महाडिक, संध्याताई शेंडे,. मिलिंद कुलथे (तहसीलदार), सोनाली भदे, राजाराम रसाळ,यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की कुकडी योजने साठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करण्यात आले त्यांना अद्यापही मावेजा मिळाला नाही, या करिता अनेक वर्षांपासून संघर्ष सुरूच आहे, यात काही कायद्याच्या अडचणी येत आहेत तर काही ठिकाणी प्रशासकीय बाबी आहेत, यात जे कायदे शेतकऱ्यांना हिताचे नाहीत ते निश्चित बदलू असे सांगितले. एवढेच नाहीतर मावेजाच्या संदर्भात लवकरच वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन हे लवकरात लवकर कसे पैसे देता येतील हे पाहू असे आश्वासन दिले. आता आपले सरकार आहे त्यामुळे आपले कामे मार्गी लागत आहे, मग ते विकास कामे असो अथवा निधीची उपलब्धता आता आपल्या सढळ हाताने सर्वच उपलब्ध होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जिल्ह्य़ात नियोजन समितीतून, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनेचा निधी मोठ्याप्रमाणात मिळत आहे. मागील तीन वर्षांत एक फुटकी कवडी देखील विरोधकांनी आपल्या जिल्ह्य़ात आणली नाही आणि आज तेच सर्वत्र चर्चा करत आहेत हे विशेष असल्याचे त्यांनी सांगितले. वाळू माफियांनी या परिसरात सध्या धुमाकूळ घातला होता मात्र आपण यावर आता अंकुश लावला असून वाळु वर आपण राजकारण करत नाही, मात्र सर्वसामान्यांना पाचशे रूपये ब्रास वाळू ही मिळाली पाहिजे यासाठी निश्चित काम करू अशी ग्वाही देतांना खा.विखे यांनी वाळु तस्करांची किड आम्ही कायमस्वरूपी काढून टाकू असे सांगितले.
देशात आणि आता आपल्या राज्यात सर्वसामान्यांना केंद्रित करून विकासाची कामे सुरू असून यासाठी आपण ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणांनी उभे राहीले पाहिजे असे आवाहन शेवटी त्यांनी केले.
यावेळी भिंगाण 45.96 लक्ष, टाकळी कडेवळीत1.63लक्ष , शेडगाव 1.57लक्ष, चिखलठाणवाडी61लक्ष, कणसेवाडी 89 लक्ष, वेळू 1.20 लक्ष, चोराचीवाडी 61.28 लक्ष रूपयांच्या तसेच विविध विकास कामाचा शुभारंभ खा.डाॅ.सुजय विखे पाटील, माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांच्या हस्ते झाला, या शुभारंभ कार्यक्रमास पंचक्रोशीतील ग्रामस्थासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.