डॉ. विखे पाटील फार्मसी महाविद्यालयास नॅकचे 'ए' मानांकन.

Ahmednagar Breaking News
0

डॉ. विखे पाटील फार्मसी महाविद्यालयास नॅकचे 'ए' मानांकन.

अहमदनगर, प्रतिनिधी. (23. मार्च.) : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे, फार्मसी महाविद्यालयास नुकतेच नॅशनल असेसमेंट अॅन्ड अॅकिडिटेशन कौन्सिल (नॅक), बंगलोर यांचे 'ए' मानांकन मिळाले आहे,अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रताप पवार यांनी दिली.महाविद्यालयात नॅकचे टिमने दि.१६ व १७ मार्च, २०२३ रोजी भेट देवून त्यांचे मुल्यमापन प्रक्रियेच्या नियमानुसार परिक्षण केले होते. त्यामध्ये महाविद्यालयातील शिक्षण संसाधने, विद्यार्थ्याच्या मुलभूत सोईसुविधा,विद्यार्थी हा केंद्रबिंदू डोळयासमोर ठेवून शिकविण्याची व शिकण्याची आधुनिक पध्दत, संशोधनातील नावीन्य व त्याचा विस्तार, नॅशनल व इंटरनॅशनल स्तरावरील पेपर प्रेझेंटेशन आणि रिसर्च पब्लिकेशनला आर्थिक मदत, विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट, कंपन्यांशी सामंजस्य करार,समाजाच्या सर्वांगिन प्रगतीसाठी हाती घेतलेले विविध उपक्रम, व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगतीसाठी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे व्यवस्थापन सतत प्रयत्नशील असल्याने हे मानांकन मिळाल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रताप पवार व आय. क्यु.ए. सी. कोऑर्डिनेटर डॉ. रमेश सावंत यांनी सांगितले.कमिटीने माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्ततर कर्मचारी, उद्योग क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधून त्यांच्या सुचना व प्रतिक्रिया नोंदविल्या दोन दिवस मूल्यमापन सर्वेक्षणात नॅक कमिटीने विविध विभागाला भेट देवून होस्टेल, कॅन्टीन, सोयी-सुविधा यांचे निरीक्षण करुन सर्वेक्षणात या बाबी नोंदविल्याचे प्राचार्य डॉ. प्रताप पवार यांनी सांगितले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

महाविद्यालयास मिळालेल्या या मानांकनाबद्दल डॉ. विखे पाटील फौंडेशनचे अध्यक्ष व विश्वस्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व विश्वस्त सौ शालिनीताई विखे पाटील,विश्वस्त व मुख्य कार्यकारी अधिकारी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी कौतुक केले.महाविद्यालयातील मूल्यामापन तपासणी आणि नेटच्या तयारीसाठी संस्थेचे सेक्रेटरी डॉ पी एम गायकवाड शैक्षणिक सल्लागार लेफ्टनंट जनरल डॉ. बी सदानंदा (निवृत्त) मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे डॉक्टर अभिजीत दिवटे उपसंचालक तंत्र, प्रा. सुनील कलापुरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top