ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारचे संदेश कोणीही खात्री न करता सोशल मीडियाद्वारे प्रसारित करू नये.- पोलीस अधीक्षक राकेश ओला.

Ahmednagar Breaking News
0

कोणत्याही प्रकारच्या सोशल मिडिया वरून अक्षेपाहार्य मजकूर प्रसारित करणे हा कायदेशीर गुन्हा आहे.- पोलीस अधीक्षक राकेश ओला.

नगर,प्रतिनिधी.(13. मार्च.) : अहमदनगर जिल्हा पोलीस दलाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते कि,काही समाज कंटाकांकडून सोशल मिडियाद्वारे धार्मिक तेढ निर्माण करणारे व अफवा पसरविणारे अक्षेपाहार्य मजकूर प्रसारित करण्यात येतात व नागरिक सदर मजकुराची कोणतीही शहानिशा न करता सदरचे संदेश पुढे Forward करीत असतात. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरून कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण होत असते.

कोणत्याही प्रकारच्या सोशल मिडिया वरून जसे कि WhatsApp, Facebook, Instagram,Twitter ई. वरून अक्षेपाहार्य मजकूर प्रसारित करणे हा कायदेशीर गुन्हा आहे.

अहमदनगर सायबर पोलीस स्टेशन हे अश्या प्रकारच्या अक्षेपाहार्य संदेश पसरविणाऱ्या सर्व प्रकारच्या सोशल मिडीयावर लक्ष ठेवून आहे. तरी अहमदनगर जिल्हा पोलीस दलाकडून सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते कि ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अश्या प्रकारचे संदेश कोणीही खात्री न करता सोशल मिडियाद्वारे प्रसारित करू नये, अन्यथा सदर इसमांविरुद्ध माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० (IT Act) अन्वये कायदेशीर कार्यवाही केली जाईल.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top