वृत्तपत्र छायाचित्रकार अमोल भांबरकर यांना मातृशोक.

Ahmednagar Breaking News
0

वृत्तपत्र छायाचित्रकार अमोल भांबरकर यांना मातृशोक.

नगर,प्रतिनिधी.(13. मार्च.) : अहमदनगर-कल्याण रोडवरील भ्रुंगऋषी गृहनिर्माण सोसायटी येथील गणेशनगर मधील रहिवासी श्रीमती द्रोपदी बबनराव भांबरकरवय (65. वर्ष.)यांचे नुकतेच खाजगी हॉस्पिटलमध्ये अल्पश: आजाराने निधन झाले.विश्वहिंदु परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रिंटमिडिया प्रमुख तथा वृत्तपत्र छायाचित्रकार अमोल भांबरकर,तसेच राज्य परिवहन महामंडळ (अकोले) एस. टी. चालक सतिश भांबरकर यांच्या त्या मातोश्री होत. त्या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या.त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top