काचबिंदू हा एक चोर पावलांनी येणारा आजार आहे त्यासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे.- डॉ.प्रकाश रसाळ.

Ahmednagar Breaking News
0

रसाळ नेत्रालय येथे महिला दिन व चौथा वर्धापनदिन निमित्त सवलतीच्या दरात संपूर्ण काचबिंदू शिबिराचे आयोजन.

नगर, प्रतिनिधी.(08.मार्च.) : अहमदनगर लालटाकी येथील कालिका प्राईड,पहिला मजला येथे असलेल्या डॉ.प्रकाश रसाळ यांचे रसाळ नेत्रालय येथे महिला दिन व चौथा वर्धापनदिन निमित्त सवलतीच्या दरात संपूर्ण काचबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराची सुरुवात सकाळी 10.00 वाजता महिला पेशंटला पुष्पगुच्छ देऊन करण्यात आली. दिवसभरात साधारण 25 पेशंटनी या शिबिराचा फायदा घेतला. शिबिरात पेशंटच्या डोळ्याचा दाब मोजणे, काळया बाहुलीची जाडी मोजणे, ओ. टी. सी. तपासणे, रेटीना (डोळ्यातील मागील पडदा.) मोजणे, पेरीमेट्री तपासणे ह्या तपासण्या करण्यात आल्या. तपासणी करून झाल्यावर गरजू पेशंटला आवश्यक ती औषधे देण्यात आली. तसेच काहींना लेझर / शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला.हे सर्व सवलतीत होणार असल्याची माहिती डॉक्टर प्रकाश रसाळ यांनी दिली. तसेच यावेळी पेशंटला काचबिंदू बाबत प्रबोधन करण्यात आले.

संपूर्ण शिबिर पूर्णत्वास नेण्यास रसाळ नेत्रालयाच्या स्टाफने मेहनत घेतली.


.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top