नगर पुणे रोड कामरगाव शिवारात पिकअप-ट्रेलर -ट्रक अपघातात चार मृत्यू तर बारा जखमी.

Ahmednagar Breaking News
0

नगर पुणे रोड कामरगाव शिवारात पिकअप-ट्रेलर-ट्रक अपघातात चार मृत्यू तर बारा जखमी.

नगर,प्रतिनिधी.(23. मार्च.) : नगर पुणे रोडवर कामरगाव शिवारात हॉटेल स्माईल स्टोन जवळ पिकअप ट्रेलर ट्रक यांचा अपघात झाला असून त्यामध्ये चार व्यक्तींचा मृत्यू आणि बारा जखमी झाले आहेत.मृत व्यक्ती शिरूर तालुक्यातील अहमदाबाद आणि चिंचोली मोर येथील आहेत.

ट्रक पुण्याकडून नगरच्या दिशेने येत होता आणि पिकअप गाडी, ट्रेलर नगर कडून शिरूरकडे जात असताना अचानक ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि विरुद्ध दिशेला जाऊन पिकअप आणि ट्रेलरला उडविले.अपघाताची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top