"टायनी टॉट्स"मध्ये चिमुकल्यांनी साजरी केली सप्तरंगांची होळी.
नगर, प्रतिनिधी.(06.मार्च.) : सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड आणि तवले नगर येथील "टायनी टॉट्स "शाळेमध्ये आज चिमुकल्यांनी साजरी केली सप्तरंगांची होळी. या शाळेत कायमच विद्यार्थ्यांना सर्वधर्म समभावनाची शिकवण देऊन प्रत्येक सण साजरा करण्यात येतो. आम्ही भारतीय आमचे अनेक रंग,अनेक भाषा,अनेक वेशभूषा पण धर्म मात्र एकच " माणुसकी " असा संदेश देणारी होळी साजरी करण्यात आली. चिमुकल्यांनी यावेळी नैसर्गिक रंगाची उधळण करीत गाण्यांच्या तालावर ठेका धरत आनंदात होळी साजरी केली.