सामुहिक बलात्कार केल्याचे प्रकरणात आरोपीस जामीन मंजूर.
अहमदनगर, प्रतिनिधी. (05.मार्च.) : सिन्नर, जि. नाशिक येथील आरोपी राहुल लक्ष्मण आरने व इतर यांचे विरुद्ध सिन्नर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ६० / २०२३, भा.द.वि. कलम ३२३,३२८, ३४४, ३७६(ड), ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.सदर प्रकरणात आरोपींविरुद्ध महिलेस धर्मांतर करण्यास भाग पाडुन तिचेवर सामुहिक बलात्कार केला असे आरोप करण्यात आले होते. आरोपींना पोलीसांनी अटक करुन कस्टडीत घेतलेले होते. आरोपीच्या वतीने अॅड. संजय दुशिंग यांनी आरोपीला जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला व सदर अर्जात युक्तीवाद करुन न्यायालयाचे निदर्शनास आणुन दिले की, सदरची फिर्याद ही खोटी असून ती राजकीय द्वेषातून दाखल झालेली आहे.आरोपी आरने हे चर्चमध्ये फादर आहेत, त्यांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही व फिर्याद दाखल करण्यासाठी खुप विलंब झालेला आहे.सरकार पक्षातर्फे आरोपीने गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला आहे, त्याला जामीन देवू नये अशी मागणी करण्यात आली, परंतू दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकुण मा.न्यायालयाने आरोपीचे वकीलांचे मुद्दे ग्राह्य धरुन आरोपीस अटी व शर्तीवर राहुल लक्ष्मण आरने यास जामीनावर खुले केले.
आरोपीतर्फे अॅड. संजय दुशिंग, अॅड. महेश तवले व अॅड. संजय वालेकर यांनी काम पाहिले.