गोरगरीबांच्या आशिर्वादाने राज्यात पुन्हा युतीचे सरकार आले- खा.डाॅ.सुजय विखे पाटील.

Ahmednagar Breaking News
0

गोरगरीबांच्या आशिर्वादाने राज्यात पुन्हा युतीचे सरकार आले- खा.डाॅ.सुजय विखे पाटील.



अहमदनगर,प्रतिनिधी.(06. मार्च.) : गोरगरीबांच्या आशिर्वादात एवढी ताकद असते की ठेकेदाराचे सरकार उलथून शिंदे-फडणवीस यांचे सरकार राज्यात आले आणि आता सर्वत्र गोरगरीबांच्या कामे होऊ लागले असल्याचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले. ते नवा नागापूर येथील विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची उपस्थिती होती. 

 यावेळेस बोलताना ते म्हणाले की मागील तीन वर्षांत जे आघाडीचे सरकार होते, ते केवळ ठेकेदारासाठीच काम करत होते, मात्र आताचे शिंदे-फडणवीस सरकार आणि या सरकार मधील नंबर दोनचे खाते असलेले आपले लोकप्रिय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे गोरगरीबासाठीच काम करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणास आपल्याला मान्यता दिली. या बरोबरच या भागातील विविध विकास कामांसाठी तीन कोटी रूपयांचा निधी दिला असल्याचे त्यांनी सांगून जिल्ह्य़ात विविध योजना ह्या पुढील तीन महिन्यांत पूर्ण करणार आहोत असे सांगितले. अहमदनगर ग्रामीण भागातील आठवडी बाजार, तसेच इतर लहान मोठ्या अडचणी ह्या देखील लवकरच आपले सरकार सोडविणार असल्याचा विश्वास यावेळी खा. विखे यांनी उपस्थितांना दिला. 

या प्रसंगी दत्ता सप्रे, जालिंदर कदम, हनुमान कातोरे, डॉ बबनराव डोंगरे, बंडू नाना सप्रे, महेश कांडेकर, सागर सप्रे, संगीता सप्रे, तोरणे साहेब, प्रविण सप्रे, डॉ गाडगे सर, सुभाष दांगटे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

11 मार्च 2023 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बहुप्रतीक्षित अशा साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणास मान्यता दिली तसेच सर्वेक्षणास दोन कोटी रूपयाचा निधी देखील मंजूर केल्या बद्दल, त्यांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. 

याच नागरी सत्कार समारंभाच्या आयोजनाच्या अनुषंगाने आज बैठक संपन्न झाली. या बैठकीस माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले,यांच्यासह भाजप पदाधिकारी, जेष्ठ नेते, शेतकरी, सर्व सामान्य नागरिक यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top