खासदार सुजय विखे पाटलांनी स्वतः रस्त्यावर उतरून अनोळखी व्यक्तीला केली मदत.

Ahmednagar Breaking News
0

जेव्हा खासदार सुजय विखे पाटील खुद्द स्वतः मुंबई सारख्या शहरात सामान्य नागरिकाला मदत करतात तेव्हा....


नगर,प्रतिनिधी.(21. मार्च.) : आपल्या मतदारसंघात प्रवास करत असताना रस्त्यात अडचणीत सापडलेल्या व्यक्तींच्या मदतीला लोकप्रतिनिधी धावून गेल्याचे अनेकदा पहायला मिळते. मात्र, मतदारसंघ नसलेल्या आणि तेही मुंबईसारख्या शहरात बाहेरच्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधीने धावून जाणे विरळच. असाच प्रकार काल रात्री मुंबईत घडला.अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील रात्री मुंबईत ज्येष्ठ नागरिकांच्या एका गाडीला धक्का मारताना दिसले. कल्याणमधील एका अभियंत्याने ही दृष्य टिपून सोशल मीडियात पोस्ट केले आहे.

केतन भोई या कल्याणमध्ये राहणाऱ्या अभियंत्याने ही पोस्ट केली आहे. भोई यांचे शिक्षण नगरच्या विखे पाटील अभियांत्रिक महाविद्यालयात झालेले आहे. त्यामुळे त्यांनी खासदार डॉ. विखे पाटील यांना ओळखले. भोई लिहितात…आज ऑफिस संपल्यानंतर कॅबने घरी जात असताना अंधेरी येथे ३ लोकं एका गाडीला धक्का देताना दिसले. मुंबईत असे प्रसंग फार कमी वेळा दिसतात त्यामुळे कुतूहलाने बघत होतो. तेवढ्यात लक्षात आलं की अरे यात मध्यभागी तर आपले नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आहेत. पटकन फोटो काढायचा प्रयत्न केला पण नीट फोटो घेता आला नाही. कुठलाही बडेजाव न करता नगरच्या बाहेर स्वतः रस्त्यावर उतरून एका अनोळखी व्यक्तीला मदत करणारे आमच्या नगरचे खासदार आहेत हे बघून अभिमान वाटला असे खासदार सर्वांना मिळो.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top