चैत्र शोभा यात्रा उत्सवात प.पु.श्री.श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिविंग परिवाराचा विशेष सहभाग.

Ahmednagar Breaking News
0

रेडिओ सिटी,नगर आयोजित गुढीपाडव्याच्या निमित्ताने नगर शहरातील भव्य उत्सवात प.पु.श्री.श्री.रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचा विशेष सहभाग.

नगर, प्रतिनिधी.(19.मार्च.) : रेडिओ सिटी नगर आयोजित, गुढीपाडव्याच्या निमित्ताने नगर शहरातील भव्य उत्सव,चैत्र शोभा यात्रा 2023.22 मार्च रोजी सकाळी 5:45 ते 8 वाजता होणार आहे.याची सुरवात प्रोफेसर कॉलनी चौक सावेडी येथून होऊन गुलमोहर रोड मार्गे एकविरा चौक येथे समाप्ती होणार आहे.अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

या शोभा यात्रे मध्ये मोठ्या संख्येनं नगर आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक, स्वयंसेवक, साधक उपस्थित राहणार आहेत.तसेच नगर शहरातील,जिल्ह्यातील अनेक मान्यवर,आमदार, खासदार, डॉक्टर्स,उद्योगपती,कलाकार,व्यावसायिक, विद्यार्थी ,पालक , नागरिक सर्वच नगरकर मोठ्या संख्येने याचा आनंद घेणार आहेत.आपण जरूर या मराठी सांस्कृतिक उत्सवामध्ये सहभाग घ्यावा ही विनंती.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top