नोबल हॉस्पिटलचा गौरव....
नगर,प्रतिनिधी. (01. मार्च.) : केंद्र व राज्य सरकारच्या वतीने स्वच्छ सर्व्हेक्षण -2023, माझी वसुंधरा 3.0, तसेच शहर सौंदर्यीकरण अंतर्गत अ.नगर महापालिकेच्या वतीने स्वच्छता स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मोठ्या संख्येने शहरातील विविध हॉस्पिटल्स व आस्थापनांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच अ.नगर मनपाच्या वतीने जाहीर करून विजेत्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या स्वच्छता स्पर्धेत येथील नोबल हॉस्पिटलला प्रथम क्रमांक मिळाला. त्याचे प्रमाणपत्र महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या हस्ते ‘नोबल’चे मुख्य प्रशासकीय अधिकारी राहुल हिरे यांना प्रदान करण्यात आले. यावेळी उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे व यशवंत डांगे उपस्थित होते. केंद्र व राज्य सरकारच्या वतीने स्वच्छ सर्व्हेक्षण 2023, माझी वसुंधरा 3.0 आणि अ.नगर महापालिकेच्या वतीने शहर सौंदर्यीकरण अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छता स्पर्धेत विविध निकषानुसार नोबल हॉस्पिटलला प्रथम क्रमांक देऊन गौरविण्यात आले. याबद्दल हॉस्पिटलचे डॉ.बापूसाहेब कांडेकर, सर्व सहकारी डॉक्टर्स, प्रशासकीय अधिकारी, स्टाफ आदींचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.