अठ्ठावीस वर्षानंतर एकत्र आलेल्या मित्र- मैत्रिणींनी घेतला सामाजीक कामाचा निर्णय.

Ahmednagar Breaking News
0

अठ्ठावीस वर्षानंतर एकत्र आलेल्या मित्र- मैत्रिणींनी घेतला सामाजीक कामाचा निर्णय.

नगर,प्रतिनिधी.(01. मार्च.) : दहावीनंतर शिक्षण आणि त्यानंतर व्यवसाय, नोकरी व अन्य कारणाने दुरावलेले मित्र २८ वर्षानंतर एकत्र आले. चाळीस ओलांडलेले हे मित्र-मैत्रिणी वेगवेगळ्या भागात व्यवसाय,नोकरीत स्थिरावले. मात्र आता आयुष्याच्या या वळणावर आलेल्या मित्र-मैत्रिणींनी सामाजीक काम करण्याचा निर्णय घेतला आहे.आठ्ठावीस वर्षानंतर एकत्र आलेले जुने मित्र-मैत्रिणी जुन्या आठवणीत हरवून गेले.

बीड जिल्ह्यातील शिरुर कासार येथील जिल्हा परिषदेत दहावीपर्यत एकत्र शिकलेले मित्र-मैत्रिणींनी एकत्र येऊन अहमदनगर येथे (स्नेहमिलन) गेट-टूगेदर कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात पुणे, बीड, परभणी, औरंगाबाद, मुंबई, नाशिक अशा वेगवेगळ्या भागात स्थायिक झालेले मित्र-मैत्रिणी सहभागी झाले होते.

त्यात प्रसिद्ध व्यवसायीक अभिजीत डुंगरवाल, आदीनाथ सूर्यवंशी, संदीप कानडे, अतीश गाडेकर, आनंद बाफना, नारायण गाडेकर, संतोश गटागट,  विनोद व्यवहारे, आदीनाथ नागरगोजे, डाॅ. अशोक मिसाळ, डाॅ. सचीन चव्हाण, डाॅ. विठ्ठल ढाकणे, डाॅ. अर्चना पालवे, मुख्याध्यापक सीमा बडे, माधुरी देसरडा,स्वाती कानडे, भाऊसाहेब नेटके, बद्रीनाथ पवार, नवनाथ पानखडे, लिंबाजी पवार, हनुमंत खेडकर, विजय केदार, अशोक शेकडे, कल्याण ढाकणे, मिना येवले, ज्योती अंदुरे, सुलभा तुपे, सुनिता जायभाये, सारिका डुंगरवाल, वैशाली लोढा, अरूणा केदार, पत्रकार सूर्यकांत नेटके आदीसह सहभागी झाले होते. व्यवसाय, नोकरीत स्थिरावलेल्या मित्रांनी यावेळी वेगवेगळ्या विषयावर चर्चा चर्चा केली. २८ वर्षाच्या कालावधीत मयत झालेल्या मित्र, गुरुवर्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मध्यंतरीच्या तीन वर्षाच्या काळात कोरोना सारख्या गंभीर संकटाशी सामोरे जाऊन आपन एकत्र आल्याचा प्रत्येकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. २८ वर्षातील प्रगती आणि वेगवेगळे अनुभव यावेळी प्रत्येकांनी सांगिते. अनेक वर्षानंतर भेटल्याने जुन्या आठवणीत हरखून गेलेले अभिजीत डुंगरवाल, आजीनाथ सूर्यवंशी, डाॅ. सचीन चव्हाण, डाॅ. अर्चना पालवे, सारिका डुंगरवाल, स्वाती कानडे आदींसह इतरांनी त्यावेळी शाळेतील जमतीजमती सांगितल्या. आतापर्यत आनंदी आणि सुखी जीवन जगताना आता आय़ुष्याच्या या वळणार आसताना पुढील काळात सेवा, प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजीक काम करण्याचा सर्व मित्रांनी निर्णय घेतला. सुत्रसंचलन पत्रकार सूर्यकांत नेटके यांनी  केले तर अभिजीत डूंगरवाल यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top