नगर मधील "श्री श्री रवीशंकर विद्या मंदिर" शाळेचा प्रथम वार्षिक समारंभ उत्साहात संपन्न.
नगर,प्रतिनिधी.(01.एप्रिल.) : आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या व श्री श्री रवी शंकरजी यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या SSRVM या शाळेचा वार्षिक समारंभ 31 मार्च रोजी सकाळी 11 वा पार पडला, CBSC पॅटर्न वर आधारित या शाळेची नगर शहरातील ही पहिलीच शाखा असून, मार्केट यार्ड च्या पाठीमागील वाकोडी रोड वर समृद्धी नगर येथे, शाळेची स्वतंत्र इमारत आहे.
मागील वर्षी शाळेचे संचालन सुरू झाले व या प्रथम वार्षिक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमासाठी डॉ राजश्री वर्मा या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या, या प्रसंगी सर्व संचालक मंडळ, शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
प्ले ग्रुप ,नर्सरी, जु व सी केजी या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरण केले ज्यामध्ये शोल्क पठण, नृत्य ,गायन असे प्रकार होते, सर्व शिक्षकांनी वर्ष भर अथक प्ररिश्रम घेत मुलांच्या कला गुणांना वाव मिळेल या साठी प्रयत्न केले.
उत्तम शिक्षक वर्ग, योग्य व्यवस्थापन ,मोकळ्या वातावरणात, आनंदी व उल्हासदायी शिक्षण पद्धती ही या शाळेची जमेची बाजू आहे.या कार्यक्रमात बोलतांना पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले व शाळेच्या प्रगतीची माहिती घेतली. शाळेचे संचालिका सौ माधवी काळे - डोमे मॅडम यांनी कर्मक्रमाचे प्रास्ताविक केले व सर्व माहिती उपस्तीताना दिली, संचालक श्री राजेंद्र पाचे यांनी पालकांना मार्गदर्शन केले व शाळेच्या कार्यवार अभिमान व्यक्त केला, या वेळी संचालिका सौ संगीता पाचे, सामाजिक कार्यकर्ते श्री नरेंद्र बोठे व पालक बंधू भगिनी उपस्थित होते.
अत्यंत उत्साही वातावरणात खेळीमेळीच्या पद्धतीने सर्व कार्यक्रम पार पडला.मुलांना गिफ्ट व खाऊचे वाटप करण्यात आले.नूतन वार्षिक वर्ष्याचे ऍडमिशन सुरू झाले असून , पालकांनी ऑफिस मध्ये येऊन माहिती घ्यावी अशी घोषणा यावेळी करण्यात आली.सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका व आभार काळे मॅडम यांनी व्यक्त केले.