मीरा पाटील यांच्या टाईनी टॉट्स नर्सरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्प.

Ahmednagar Breaking News
0

मीरा पाटील यांच्या टाईनी टॉट्स नर्सरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्प.

नगर प्रतिनिधी. (11. एप्रिल.) : कोविड मुळे सर्वच मुलांना घरातून ऑनलाईन शिक्षण सुरू होते, परंतु मुलांना ते व्यवस्थित शिकविता आले नाही. ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचा फायदा होण्याऐवजी जास्त तोटा झाला. त्यांची वय वाढली व त्यांना बळजबरीने पुढच्या वर्गात बसावे लागले.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या लेवलमध्ये कुठलाही फरक न होता त्यांची शैक्षणिक क्षमता केविलवाणी झाली. 

ज्या विद्यार्थ्यांची क्षमता शिक्षणामध्ये कमी आहे,ज्या मुलांना कुठलीही भाषा वाचता येत नाही,अक्षर ओळखीमध्ये अडचण आहे, गणितामध्ये अडचण आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी मीरा पाटील यांनी खास पालकांच्या आग्रहास्तव समर कॅम्पचे आयोजन केले आहे. क्लासमध्ये इंग्रजी,मॅथ्स,फोनिक्स अत्यंत सोप्या पद्धतीने शिकविण्यात येईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना लिहिता व वाचता येईल याकडे विशेष लक्ष पुरविण्यात येईल.के. जी. ते तिसरी पर्यंतचे क्लासेस दि.15. एप्रिल पासून सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत सुरु होणार आहेत.

तरी ज्या पालकांना आपल्या मुलांना समर कॅम्प मध्ये पाठवायचे असेल त्यांनी "मीरा पाटीलस टाइनी टॉट्स ", अष्टविनायक कॉलनी,पाईपलाईन रोड, सावेडी,अहमदनगर. मोबाईल नंबर.8275201406./8275201884. यावर संपर्क साधावा.

                 स्पोकन इंग्लिश क्लासेस.

 आपण मुलांना इंग्रजी माध्यमाच्या अथवा सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतो परंतु नंतर आपल्या लक्षात येते की शाळेत मुलं एकमेकांशी मराठी किंवा हिंदी भाषेतच बोलतात. त्यामुळे त्यांना इंग्रजी बोलण्याचा सरावच होत नाही,हे लक्षात घेऊन अशा मुलांसाठी आपण स्पोकन इंग्रजी हा खास क्लास सुरु केला आहे. हा क्लास इंडियन एअर फोर्स मधील तसेच इंडियन कस्टम्स मधील रिटायर्ड एज्युकेशन ऑफिसर, सीनियर सुप्रीटेंडंट  मानसिंग पाटील हे घेणार आहेत. कुठल्याही इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top