सामान्य नागरिकांसाठी मदतीला धावणारा खासदार डॉ.सुजय विखे पाटील.

Ahmednagar Breaking News
0

कायम आपण स्वतः कोण आहोत आणि ते आपलं काम आहे का नाही याचा कधीही विचार न करता मदतीला धावणारा खासदार डॉ.सुजय विखे पाटील.


नगर, प्रतिनिधी.(07.एप्रिल.) : खासदार डॉ.सुजय विखे पाटील आज शेवगाव तालुक्याच्या दौऱ्यावर होते.शेवगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे रस्त्यावर अनेक भागात झाडे उन्मळून पडले होते.याभागात दौरा करत असताना भातकुड गावाजवळ मुख्य रस्त्यावर मोठे झाडे उन्मळून पडले होते.येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना ह्या झाडामुळे वाहतुकीस अडथळा होत होता. खासदार सुजय विखे पाटील यांनी ते झाड सहकाऱ्यांच्या मदतीने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. त्यांच्या या कृत्यामुळे त्या भागातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.

खासदार सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये असेच एका ज्येष्ठ नागरिकाच्या रात्रीच्या वेळी बंद पडलेल्या कारला धक्का मारून मदत केली.विखे पाटलांच्या अशा कामांमुळे त्यांची जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात देखील कायम चर्चा होऊन कौतुक होत असते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top