धोकरिया यांनी केलेल्या सामाजिक कार्याची पावती. - आ. संग्राम जगताप.

Ahmednagar Breaking News
1 minute read
0

धोकरिया यांनी केलेल्या सामाजिक कार्याची पावती. - आ. संग्राम जगताप.

नगर, प्रतिनिधी.(20.एप्रिल.) : अहमदनगर खंडेलवाल समाजाच्या अध्यक्षपदी राहुल धोकरिया यांची निवड झाल्याबद्दल श्रीनिवास बोज्जा मित्र मंडळाच्या वतीने आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी हमाल पंचायतचे अध्यक्ष नगरसेवक अविनाश घुले, सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा, संपत नलावडे,प्रणित अनमल,अशोक बोज्जा, ऋषिकेश बिटला, मनोज बोज्जा, विशाल धात्रक, यश चिटमील, ऋषिकेश कुंटला,अथर्व बोज्जा आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना आ.जगताप म्हणाले चांगले काम केल्यास त्याचे फळ हे चांगलेच मिळते, धोकरिया यांनी सामाजिक कार्य केल्या असल्यामुळेच त्यांना खंडेलवाल समाजाच्या अध्यक्षपदी निवड केली. ही निवड म्हणजे त्यांच्या सामाजिक कार्याची पावती आहे.यावेळी नगरसेवक घुले यांनी समाजासाठी समाजउपयोगी कार्य करावे, आपलेल्या मिळालेला पदाचा उपयोग स्वतःसाठी न करता समाजासाठी करावा असे आवाहन केले.यावेळी श्रीनिवास बोज्जा मित्र मंडळाच्या वतीने आ. जगताप यांच्या हस्ते राहुल धोकरिया यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.श्रीनिवास बोज्जा यांनी सर्वांचे स्वागत केले व आभार  ऋषिकेश बिटला यांनी मानले.

To Top