जागतिक आरोग्य दिनानिमित्त फिनिक्स व जितो च्यावतीने अवयव दान जनजागृती.

Ahmednagar Breaking News
0

अवयव दानाबाबत जागृती होऊन ही चळवळ व्यापक बनली पाहिजे - जवाहर मुथा.


नगर, प्रतिनिधी. (07.एप्रिल.) : आज प्रत्येकाचे जीवन हे धावपळीचे झाले आहे. त्यामुळे व्यक्तीला आपल्या आरोग्यकडे लक्ष देण्यास वेळ नाही, त्यामुळे भविष्यात आरोग्याचे मोठे प्रश्न निर्माण होत असतात. मनुष्याचे आरोग्य चांगले असेल तर त्याला कोणतही गोष्ट अशक्य नाही. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमित व्यायाम, आहार-विहार आणि तपासणी करणे आवश्यक आहे. आजच्या आरोग्य दिनानिमित्त फिनिक्स व जितो च्यावतीने अवयव दानाविषयी जागृती करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. कारण आजही अनेकांना अवयव दानाबाबत समज-गैरसमाज आहेत, तसेच काही अंधश्रद्धाही आहेत. आज विज्ञान इतके पुढे गेले आहे की, अवयव प्रत्यारोपणाने  मनुष्य पुर्वीप्रमाणे काम करु शकतो. त्यासाठी अवयव दानाबाबत जागृती होऊन ही चळवळ व्यापक बनली पाहिजे, असे प्रतिपादन जवाहर मुथा यांनी केले.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त फिनिक्स फौंडेशन व जितो यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित अवयव दान जनजागृती अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी जितोचे जवाहर मुथा, युथविंग चेअरमन गौतम मुथा, फिनिक्सचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, अमित मुथा, जितो सेवा कार्याचे समन्वयक पुनित भंडारी, लेडिज विंग चेअरमन मेघना मुनोत, चेतन भंडारी, अलोक मुनोत, केतन मुनोत, रितेश पटवा, कमलेश मुनोत, सौरभ भंडारी, तुषार कर्नावट, जिल्हा रुग्णालयाचे सतीश आहिरे आदि उपस्थित होते. 

याप्रसंगी जालिंदर बोरुडे म्हणाले, फिनिक्स फौंडेशनच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात गेल्या 30 वर्षांपासून काम सुरु आहे. मोफत शिबीराच्या माध्यमातून गरजूंना उपचार मिळवून देण्यात येत आहे. नेत्रतपासणी व मोतीबिंदू शिबीराच्या माध्यमातून हजारो लोकांना दृष्टी देण्याचे काम झाले आणि ते अखंडपणे सुरु आहे. त्याचबरोबर अवयव दानाबाबत जागृती करण्यात येऊन अनेकांचे संकल्प अर्ज भरुन घेण्यात येत आहेत. त्यास नागरिकांचाही उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. आजच्या आरोग्य दिनही नागरिकांबरोबरच युवकांना दिलेला प्रतिसाद आमचा उत्साह वाढविणार आहे. 

याप्रसंगी गौतम मुनोत म्हणाले, नागरिकांमध्ये आरोग्याबाबत व अवयव दान, नेत्रदानाबाबत जागृती करुन लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा उपक्रमात जितो नेहमीच सहभागी होत राहील, असे सांगितले.यावेळी अवयव दान संकल्प पत्र नागरिक, युवकांसह पोलिस कर्मचार्यांनीही भरुन दिले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top