आर्ट ऑफ लिव्हिंग अहमदनगर आयोजित आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक कलाकार विक्रम हाजरा यांचा संगीत संध्या कार्यक्रम अहमदनगरमध्ये.
नगर, प्रतिनिधी. (29. एप्रिल.) : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक कलाकार विक्रम हाजरा हे भारतीय भक्ती संगीतातील अग्रगण्य नाव आहे.विक्रम हाजरा हे अनेक पैलू असलेल्या हिऱ्यासारखे आहेत. ते श्री श्री रविशंकर आर्ट ऑफ लिव्हिंग (AoL) शी संबंधित लेखक, तत्त्वज्ञ, आध्यात्मिक मार्गदर्शक, शिक्षक आणि प्रोग्रामर आहेत. तथापि, मुळात ते एक संगीतकार आहेत, जे केवळ संगीत निर्माण करीत नाहीत तर ते एक "आध्यात्मिक रॉक स्टार" आहेत जे त्यांच्या श्रोत्यांच्याच आत्म्यापर्यन्त जाणारे जणू एक दार उघडतात.
त्यांनी आजपर्यंत 20 हून अधिक अल्बम आणि सुमारे 50 देशांमध्ये जॅमपॅक्ड कॉन्सर्ट केलेले आहेत. भक्तिसंगीतात चक्क इलेक्ट्रिक गिटार आणि जॅझ-रॉक सारखा माहौल आणण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. या अशा जागतिक संगीत शैली मध्ये लोकसंगीत, पारंपारिक मंत्र आणि प्राचीन तत्त्वज्ञान सादर करणारे ते पहिले असल्याने, त्यांच्या कार्यक्रमास एक रोमांचक स्वरूप प्राप्त होते.
विक्रम हाजरा यांनी लंडनच्या ब्लूम्सबरी थिएटरपासून ते जोहान्सबर्गचे लिंडर ऑडिटोरियम, दिल्लीचे सिरी फोर्ट ऑडिटोरियम, मुंबईचे षण्मुखानंद हॉल, रॉयल ऑपेरा हाऊस आणि एनसीपीए टाटा थिएटर अशा प्रतिष्ठित ठिकाणी सादरीकरण केले आहे. आपल्या नगरमध्ये मध्येच, आर्ट ॲाफ लिव्हींग अहमदनगर ने आयोजित MYSTIC मेलोडीएस एक संगीतमय संध्याकाळ हा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी अहमदनगर वासियांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग अहमदनगर यांनी केले आहे.
खालील लिंकवर आपले सीट लवकरात लवकर बूक करा
https://aolahmednagargkevents.in/booking/index.php
ठिकाण : माऊली सभागृह, प्रेमदान चौक,झोपडीकँटीन, अहमदनगर.