राष्ट्र पुरुषांचे विचार आणि कार्य कृतीतून सुरु ठेवणे हाच त्यांच्या कार्याचा गौरव -पो.नि.मंगेश बेंडकोळी.

Ahmednagar Breaking News
0

महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त फिनिक्स फौंडेशनचा सामाजिक उपक्रम.

नगर, प्रतिनिधी. (10. एप्रिल.) : समाजसुधारणेत महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान राहिले आहे. समाजातील प्रत्येक घटकांना त्यांचे हक्क व न्याय मिळावा, यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांचे विचार आणि कार्य आपण पुढे सुरु ठेवणे हाच त्यांच्या कार्याचा गौरव होणार आहे. महाग होत चाललेल्या आरोग्य सेवेमुळे सर्वसामान्य, गरजू आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु फिनिक्स फौंडेशनच्यावतीने गरीब-गरजू रुग्णांसाठी राबविण्यात येणारा उपक्रम समाजासाठी आदर्शवत असाच आहे. अशा उपक्रमातून त्यांना मिळणारी मोफत आरोग्य सेवा ही त्यांच्या जीवनात उभारी देणारी आहे. नेत्र विकार आणि मोतबिंदू हा आजार आज सर्वसामान्य होत आहे, अशा रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करुन त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचे काम या शिबीरातून होत आहे,  असे प्रतिपादन भिंगार कॅम्प पोलिस  स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक मंगेश बेंडकोळी यांनी केले.


         क्रांतीसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फिनिक्स फौंडेशनच्यावतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भिंगार कॅम्प पोलिस  स्टेशनचे पोलिस निरिक्षक मंगेश बेंडकोळी, भिंगार बँकेचे चेअरमन अनिलराव झोडगे, व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी, फिनिक्सचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, नामदेव लंगोटे, बापूसाहेब शिंदे, नारायण धाडगे, एकनाथ जाधव, डॉ.विशाल घंगाळे, मोहन कुर्हे, पांडूरंग धाडगे, गोरक्ष राऊत, महेश बोरुडे, सौरभ बोरुडे, गोकूळ गिलचे, शाम जाधव, मुरलीधर दरवडे, पो.कॉ.सचिन धोंडे, पो.कॉ.राहुल गोरे, विजय धाडगे आदि उपस्थित होते. 

याप्रसंगी अनिलराव झोडगे म्हणाले, फिनिक्स फौंडेशनच्या माध्यमातून गरीब-गरजू, वृद्धांची जी मोफत आरोग्य सेवा होत आहे, ती खरोखर सर्वसामान्यांना आधार देणारी आहे. महाग होत चाललेल्या उपचार मोफत शिबीराच्या माध्यमातून गरजूंना मिळत असल्याने त्यांच्या जीवनात आनंद भरण्याचे काम होत आहे. विशेषत: वृद्धांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करुन त्यांना दृष्टी देण्याचे काम जालिंदर बोरुडे करत आहे. त्यांच्या उपक्रमास आमचे नेहमीच सहकार्य राहील, असे सांगितले.

प्रास्तविकात जालिंदर बोरुडे म्हणाले, फिनिक्स फौंडेशनच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षांपासून गरजूंना आरोग्य सेवा मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्र पुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त मोफत शिबीराच्या माध्यमातून त्यांचे दु:ख नाहिसे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या माध्यमातून हजारोंच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचे काम केले जात आहे. आजच्या शिबीरातील रुग्णांची मोफत तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय ताजने यांनी केले तर आभार मोहन कुर्हे यांनी मानले. या शिबीरात बुधराणी हॉस्पिटलचे प्रशांत पाटील, विशाल भिंगारदिवे, मिरा पटारे, महेश धर्माधिकारी आदिंनी केली. या शिबीरात 438 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली तर 74 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी पुणे येथे पाठविण्यात आले. 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top