सैनिकांचा आदर्श घेऊन भावी पिढीने आपल्या भविष्याची वाटचाल करावी. - खा.डॉ.सुजय विखे पाटील.

Ahmednagar Breaking News
0

समाजात निस्वार्थ भावनेनं काम केले तरच समाजाची जडणघडण होते. - खा.डॉ.सुजय विखे पाटील.

अहमदनगर,प्रतिनिधी. (16. एप्रिल.) : समाजात अनेक व्यक्ती ह्या निस्वार्थ भावनेने काम करत असतात यातूनच खऱ्या समाजाची जडणघडण होते,अशा पद्तीने काम करण्याची गरज असल्याचे दक्षिण अहमदनगरचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले. ते अहमदनगर तालुक्यातील घोसपुरी येथील गावाच्या प्रवेशद्वाराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पद्मश्री पोपटराव पवार, कारगिल योद्धा नायक दिपचंद पंचग्रामी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना ते म्हणाले की सैनिक यांचे कार्य हे दीपस्तंभ सारखे असते यातून कायम सर्वांनी बोध घेणे गरजेचे असून यांचा आदर्श घेवून भावी पिढीने आपली भविष्याची वाटचाल करावी. देशाच्या संरक्षणासाठी कायम तत्पर असलेले हे सैनिक वेळप्रसंगी कुठल्याही गोष्टीची तमा बाळगत नाहीत. अशाच पद्धतीने आपणही आपले जीवन सर्व सामन्यासाठी व्यतीत करावे. सैनिकाच्या या कार्याचा आपल्या सर्वांना गौरव असला पाहिजे आणि त्यांची जी देशाच्या प्रती तळमळ आहे तशी आपल्यात ही असली पाहिजे अशी भावना व्यक्त करताना सुजय विखे म्हणाले की विखे पाटील फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी ३०० मुलामुलींना स्पर्धात्मक परीक्षेसाठी शिष्यवृत्ती देणार असल्याचे जाहीर केले. यावेळी पद्मश्री पोपटराव पवार,कारगिल योद्धा दिपचंद पंचग्रामी यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top