मागील काळात केलेली लूट थांबवून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम करायचं आहे.- खा.डॉ.सुजय विखे पाटील.

Ahmednagar Breaking News
0

शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावयाचे आहे - खा.डॉ.सुजय विखे पाटील.

राहुरी,प्रतिनिधी. (26. एप्रिल.) : बाजार समितीच्या माध्यमातून विरोधकांनी मागील काळात केलेली लूट थांबवून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम राहुरी तालुका विकास मंडळाच्या उमेदवार करतील असा विश्वास खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त करून या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते.यावेळी व्यापीठावर विकास मंडळाचे प्रमुख चाचा तनपुरे, सुभाष पाटील, जेष्ठ नेते सुभाष पाटील,माजी आ चंद्रशेखर कदम,राहुरी कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे,रावसाहेब तनपुरे,तानाजी धसाळ, विश्वासराव कडू, सुरेश करपे,दादा पाटील सोनवणे,उत्तमराव म्हसे, किशोर वणे ,सुरसिंगराव पवार ,राजेंद्र साबळे,सुदामराव टाकसाळ, शिवाजीराव डौले,मुरली कदम,दादा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना ते म्हणाले की राहुरी तालुका हा आगळावेगळा असा तालुका आहे, या भागातील शेतकरी हा साधा सरळ आहे आणि याच शेतकऱ्यास आपल्याला न्याय द्यायचा आहे, मागील काळात जी लूट केली ती लूट आपल्या सर्वांना थांबवायचे आहे, या करिता आपल्या सर्वांना एकत्रित येवून ह्या टोळीला बाहेर काढावयाचे आहे. या पॅनल मध्ये जे उमेदवार उभे आहेत ते सर्वसामान्य कुटुंबातील असे असून यांचा प्रपंच हा निवडणुकीवर अथवा संचालक पदावर चालणारा नाही , ते आपल्या जबाबदाऱ्या अत्यंत चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत, म्हणून त्यांना ही उमेदवारी दिली आहे. याच्या उलट विरोधकांनी बाजार समितीचा सभापती, उपसभापती, सचिव असे सर्व काही ठरविले असून पाच कोटी कसे लुटायचे याचा आराखडा देखील त्यांनी ठरविला असल्याचे सुजय विखे यांनी सांगताना हे सर्व बदलण्यासाठी विकास मंडळाच्या उमेदवाराना आपण संधी द्या असे आवाहन केले. 

स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या संघर्षाचा वारसा आपण चालवत आहोत , त्यामुळे संघर्ष, कष्ट, मेहनत हे आपल्याला वारसाहक्काने मिळाले आहे, यांच्याच जोरावर आपण ही निवडणूक लढवत आहोत हे सांगताना सुजय यांनी मागील तीन वर्षाच्या सत्तेच्या काळात तत्कालीन राज्यमंत्र्यांनी आपल्या खात्या मार्फत साधी एक डीपी बसवली नाही ते आम्हाला विकास काय हे विचारात आहेत हे विशेष, अशा संधीसाधू नेत्याला काय म्हणावे असा सवाल केला. आमच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करताना त्यांनी एकदाही कारखाना कसा आणि किती नफ्यात चालवला हे पहिले नाही हे विशेष.

आपला नाकर्त्येपणा झाकण्यासाठी सातत्याने कधी भ्रष्टाचार, तर कधी विकास कामे यावर विरोधक हे बोलत आहेत, मात्र या सर्वांस आपण मोठमोठी प्रकल्प तसेच विकास कामे करून वेळोवेळी उत्तर दिले असल्याचे खा. विखे यांनी सांगताना तालुक्यातील ३२ गावात साडेतीन कोटी रुपयाचा निधी केवळ नऊ महिन्यात दिल्याचे सांगितले. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनता यांच्या विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत असा विश्वास व्यक्त करून या निवडणुकीत राहुरी विकास मंडळाच्या सर्वच्या सर्व उमेदवारास निवडून देण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले. 

देवळाली प्रवरा, सात्रळ , महाडुक सेंटर ,वांबोरी या ठिकाणी प्रचार सभा झाल्या , यासभेत रावसाहेब तनपुरे, उत्तमराव म्हसे,किशोर वणे, सुरसिंगराव पवार, राजेंद्र साबळे, सर्व उमेदवार यांच्यासह पंचक्रोशीतील मतदार, शेतकरी, पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top