माळी महासंघाच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांना ‘समाजरत्न पुरस्कार’.

Ahmednagar Breaking News
0

जालिंदर बोरुडे यांचे आरोग्य क्षेत्रातील कार्य दिशा दर्शक. - भगवान फुलसौंदर.

नगर, प्रतिनिधी.(16.एप्रिल.) : आज समाजात अनेक गरजू-गरीब, दुर्लक्षित घटक आहेत, या घटकांच्या विकासासाठी शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत, परंतु त्याचबरोबर अनेक सामाजिक संस्थाही आपआपल्यापरी कार्य करत आहेत. अशाच सामाजिक, आरोग्य क्षेत्रात अग्रेसर असणार्या फिनिक्स फौंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांनी आरोग्य क्षेत्रात मोठे कार्य उभे केले आहे. हे सर्वांसाठी दिशादर्शक असेच आहे.  अनेक गरजू-गरीबांना मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करुन हजारो रुग्णांना  दृष्टी देण्याचे काम केले आहे. वृद्ध, गरजूंच्या जीवनात प्रकाश आणण्याचे काम त्यांनी केले आहे. आज माळी महासंघाच्यवतीने त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरवच केला असल्याचे प्रतिपादन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले. 

माळी महासंघाच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर भगवानराव फुलसौंदर, निलेश चाकणकर, प्रा.माणिक विधाते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अंबादास गारुडकर, धनंजय गारुडकर, दत्ता जाधव, परेश लोखंडे, पोलिस उपधिक्षक हरिष खेडकर, मंगल भुजबळ महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बनकर, उपाध्यक्ष नितीन डागवाले, कर्मचारी आघाडी अध्यक्ष नंदकुमार नेमाणे, अनिल लोंढे आदि उपस्थित होते.

यावेळी जालिंदर बोरुडे म्हणाले, गेल्या 30 वर्षांपासून सामाजिक, आरोग्य क्षेत्रात काम करतांना गरजू-गरीब रुग्णांना सेवा देऊन त्यांच्या जीवनात चैतन्य निर्माण करण्याचे काम आपण करत आहोत. या कार्यात अनेकांचे सहकार्य मिळत असल्याने हे कार्य अविरत सुरु आहे. आजच्या पुरस्काराने आपला उत्साह वाढणार असून, हे कार्य अधिक व्यापक करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे सांगितले.

महासंघाचे अध्यक्ष गणेश बनकर यांनी माळी महासंघाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांची प्रगती व्हावी, त्यांचे जीवन सुसहाय्य व्हावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचबरोबर विविध क्षेत्रात कार्यरत असणार्या मान्यवरांचा पुरस्काररुपी सन्मान करुन त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले. 


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top