वन्यपशु - प्राण्यांसाठी श्री श्री जलकुंभ.

Ahmednagar Breaking News
0

आर्ट ऑफ लिविंग अहमदनगर आयोजित श्री श्री जलकुंभ; केली वन्यपशु-प्राण्यांची सेवा.

नगर, प्रतिनिधी. (04.एप्रिल.) : उन्हाची दाहकता वाढत असल्याने वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांजवळ येत आहेत. यातून बऱ्याचदा त्यांचा मानवाशी संघर्ष होतो. कधी कधी रस्ते ओलांडताना अपघात होतात, म्हणून आर्ट ऑफ लिविंगच्या अहमदनगर टीमने श्री श्री जलकुंभचे आयोजन केले होते. श्री. सतीशकुमार रोकडे यांच्या संकल्पनेतून आर्ट ऑफ लिविंगच्या अहमदनगर टीमने चांदबीबी महाल, पाथर्डीसह परिसरात मुक्याप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे.  

चांदबीबी महालनजीक अनेक वस्त्या आहेत. वन विभागअंतर्गत येणाऱ्या जंगलामध्ये हरिण, काळवीट, मोर, ससे आदी अनेक प्रकारचे जंगली प्राणी व पक्षी वास्तव्यास आहेत. उन्हाळ्यात पाण्याच्या शोधार्थ अनेक वेळा हे वन्यजीव मानवी वस्तीत वावर करताना दिसून येत आहेत. 

रखरखत्या उन्हात पिण्यासाठी पाणी नसल्याने त्यांची भटकंती होते. अनेक वेळा त्यांना आपला प्राण गमवावा लागतो. वन विभागाने या मुक्यात प्राण्यांची तहान भागविण्यासाठी पाणवठे तयार केले आहेत. परंतु पाण्याचा अभाव असल्याने आर्ट ऑफ लिविंगच्या अहमदनगर टीमकडून पाणवठ्यावर पाणी सोडण्याची व्यवस्था केली आहे. 

अहमदनगरमधील आर्ट ऑफ लिविंगचे ज्ञान क्षेत्रात पार पडलेल्या नवीन टीचर सतीशकुमार रोकडे यांनी असिस्टंकेलेला पहिलाच हॅप्पीनेस प्रोग्राममध्ये सहभागी असणाऱ्या साधकांनी पाण्याची सोय केली. या उपक्रमात सिनियर टीचर्स नरेंद्र बोठे, कृष्णा पेंडम, संगीता पाचे, गणेश क्षीरसागर, सहकार्य वोलिंटर वैभव बेरड व इतर आर्ट ऑफ लिविंग स्वयंसेवक उपस्थित होते. महत्वाची बाब म्हणजे हा सर्व उपक्रम संगीत-भजन गात पार पडला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top