आजच्या ताणतणावाच्या जीवनात ध्यान साधना केल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य घडेल.- प्राचार्य.के.सी.मोहिते.

Ahmednagar Breaking News
0

विदयार्थ्यांनी सहजयोग ध्यान साधना केल्यास भविष्य घडेल.- प्राचार्य डॉ. मोहिते.

शिरूर, प्रतिनिधी. (27. एप्रिल.) : प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग ध्यान साधनेचा कार्यक्रम चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर चे विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला.यावेळी बोलतांना प्राचार्य के. सी. मोहिते म्हणाले विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणा बरोबरच मानसिक संतुलना साठी ध्यान साधनेची  नितांत गरज आहे. ध्यान साधना केल्यामुळे प्रत्येक मानवात संतुलन प्राप्त होते.आजच्या या दगदगत्या जीवनात माणूस असंतुलन झालेला असून ताण तणावात जीवन जगत आहे. अशा काळात ध्यान साधना करणे आवश्यक असून विदयार्थ्यांनी सहजयोग ध्यान साधना केल्यास भविष्य घडेल.

या वेळी 250 ते 300 विदयार्थ्यांना सहज जागृती देण्यात आली व याचा अनेक विदयार्थ्यांना अनुभूती आल्याचे मान्य केले. या पुढे रोज सहजयोग ध्यान करण्याचे कबूलही केले. या कार्यक्रमाचा फायदा शिक्षकांनाही व्हावा या साठी स्वतंत्र कार्यक्रम घेण्याची मागणी शिक्षकांनी केली.  शालेय विदयार्थ्यांबरोबर एन एन सी सी चे विदयार्थ्यांनीही या कार्यक्रमाचा लाभ घेतला.कार्यक्रमाचे स्वागत संतोष ठोसर यांनी केले तर प्रास्ताविक अहमदनगर जिल्हा सहजयोग समिती चे जिल्हा समन्वयक श्रीनिवास बोज्जा यांनी केले, संपूर्ण कार्यक्रमांची माहिती जेष्ठ सहजयोगी प्रा. प्रल्हाद आव्हाड यांनी दिली तर आभार प्रदर्शन अजय गुंजाळ यांनी मानले.  कार्यक्रमासाठी  चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूरचे प्राचार्य डॉक्टर के सी मोहिते, सत्र प्रमुख वीरकर सर,बोबडे सर, पाटील सर,पैठणकर मॅडम, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी कांबळे सर, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी नायकवडी सर तसेच जिमखाना विभागातील प्राध्यापक डॉक्टर आव्हाड व डॉक्टर चव्हाण यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमाचे नियोजन पाथर्डी, शिरूर व अहमदनगर येथील सहजयोग्यानी केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top