गड किल्ले प्रेमी परसराम गुंजाळ यांचे निधन.
नगर, प्रतिनिधी. (27. एप्रिल.) : बु-हाणनगर येथील परसराम बलभीम गुंजाळ (वय ३७ मूळ रा. तरडगव्हाण,ता.श्रीगोंदा ) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील,पत्नी,दोन मुले असा परिवार आहे. ते पुण्यातील एका नामांकित कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. पोलीस दलातील सेवानिवृत्त फौजदार बलभीम गुंजाळ यांचे ते चिरंजीव होत.त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड किल्ल्यांची मोहीम केली होती त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राभर त्यांचा परिचय होता.