कालीपुत्र कालीचरण महाराज अचानक मोहटादेवी गडावर.
पाथर्डी, प्रतिनिधी. (09. एप्रिल.) : देवीच्या साडेतीन शक्तीपीठांएवढीच ऊर्जा मोहटादेवी देवस्थानात असून हिंदू संस्कृतीचे संवर्धन जागर व संघटन कार्य प्रभावी होऊन शिवछत्रपतींच्या मनातील हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार व्हावे 'भारतीय सैन्याला प्रचंड शक्ती मिळून सर्वत्र विजयी घोडदौड व्हावी, या उद्देशाने मोहटादेवी देवस्थानात लवकरच कालिका अगस्ती ईश्वर निकुंभला महायागम नावाच्या महायज्ञाचे आयोजन करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती कालीपूत्र कालीचरण महाराज यांनी दिली.
कालीचरण महाराजांनी शनिवारी दुपारी अचानकपणे येत मोहटादेवी देवस्थानला भेट दिली . देवीची मंत्रांसह विविध स्तोत्र पठणाने महापूजा केली . 64 योगिनी , दशमहाविद्या ' अष्टभैरवांच्या स्थानांची पुजा करून श्री यंत्राकार मंदिराची पाहणी केली . येथीलविविध ठिकाणांची व देवीच्या स्वयंभू मुर्ती मधून मिळणारी सकारात्मक ऊर्जेची त्यांनी अनुभूती घेतली . देवस्थान समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे,विश्वस्त अक्षय गोसावी व गटविकास अधिकारी डॉ . जगदीश पालवे यांनी स्वागत करत देवस्थानची माहिती दिली. देवस्थानचे पुजारी भूषण साकरे, बाळासाहेब क्षीरसागर मानुरकर,भास्कर देशपांडे यांनी वेद मंत्रोच्चारात धार्मिक विधी पूर्ण केले .
यानंतर बोलताना कालीचरण महाराज म्हणाले , शास्त्रोक्त पद्धतीने मंदिराचे निर्माण कार्य झाल्याने स्थान महात्म्य खूप वाढले असून देशातील प्रमुख देवीस्थानांपैकी प्रमुख स्थान अशी ओळख या स्थानाची लवकरच होणार आहे .पूर्ण शक्तीपीठ एवढे अध्यात्मिक बळ येथे निर्माण झाले आहे.देवीच्या गोंधळ गीतांमध्ये लहानपणी मोहटादेवीचे महात्म्य ऐकले ' त्यावेळी पासून भेट देण्याची इच्छा होती.येथे मिळणारे चमत्कार कल्पनेपेक्षा अधिक पटीने असल्याने भाविकांचे कल्याण भगवती कृपेने साधले जाते. जगावर हिंदूंचे साम्राज्य व्हावे ,हिंदू संस्कृतीमय जग व्हावे यासाठी देवीला साकडे घालून महायज्ञाचे आयोजन होईल .यासाठी देवस्थान समितीने पुढाकार घ्यावा. एक दिवसीय यज्ञासाठी आपण उपस्थित राहून संपूर्ण सक्रिय सहभाग घेऊ .
देवस्थान समितीचे कार्य अतिशय श्रेष्ठ दर्जाचे आहे अशा प्रकारचे स्वयंसिद्ध मंदिर सहसा आढळत नाही.चंडीकेच्या सेवेसाठी होणाऱ्या कार्यात भक्तांनी सहभागी व्हावे,जगदंबेच्या आराधनेनेच हिंदवी स्वराज्य स्थापना आपण करू शकू. छत्रपतींना भवानी मातेने तलवार दिली आहे म्हणून देवीचे अनंत उपकार आहेत .शत्रू संहार करण्यासाठी हा यज्ञ शक्तिशाली असून भारतीय सैन्याचा जगात सर्वत्र विजय होवो अशी प्रार्थना देवीचरणी करण्यात येणार आहे .राज्यातून यासाठी भाविक येथे येतील असे कालीचरण महाराज म्हणाले.