वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा ‘मनसे’ दणका.!

Ahmednagar Breaking News
0

वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा ‘मनसे’ दणका.!

नगर, प्रतिनिधी.(10. एप्रिल.) : नगर शहरासह जिल्ह््याला अवकाळीने अक्षरश: झोडपून काढले असून अवकाळीमुळे शेतकऱ्यांसह सामान्यांचेही मोठे हाल झाले आहेत. अश्‍यातच वीज वितरण मंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा नगरकरांना अनुभवायला मिळाला. 24 ते 36 तासांपर्यंत काही भागात वीज नसल्याने लहान बालकांपासून वृध्द, छोटे-मोठे व्यवसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महावितरणचे कार्यकारी अभिंयता यांना निवेदन दिले.यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. अनिता दिघे, शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे, रतन गाडळकर, शहर सचिव डॉ. संतोष साळवे, प्रविण गायकवाड आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन - तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाका नगर शहरासह जिल्ह््यातील अनेक भागांना बसलेला आहे. या अवकाळी पावसाचा तडाका वीज वितरण कंपनीला सुध्दा बसलेला आहे. या दोन-तीन दिवसांत संपूर्ण जिल्ह््यात तसेच नगर शहर व उपनगरातील अनेक भागाला आपल्या भोंगळ कारभाराचा फटका बसलेला आहे. यामुळे अनेक उद्योजक, व्यापारी, छोटे-मोठे व्यवसायिक तसेच नागरिकांना याचा फटका बसून यांचे लाखो रुपयांचे नुकसान आपल्या कृपेमुळे झालेले आहे. नगर शहरातील काही भागात तर गेल्या 24 ते 36 तासापर्यंत वीज नसल्याने लहान मुलांबरोबर अनेक वृध्द नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आता तर एकदा वीज गेली की ती कधी येईल याची खात्री सुध्दा स्वत: ब्रम्हदेव देवू शकणार नाही. अशी शंका आपल्या कारभारामुळे निर्माण झाली आहे. वीज गेल्यानंतर अनेक नागरिक विविध भागातील आपल्या कार्यालयाकडे वीजेबाबत विचारणा करण्यासाठी जात असतात किंवा टेलिफोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न करत असतात. यावेळी आपले मुजोर अधिकारी व कर्मचारी आपले फोन बंद करुन ठेवत असतात. यामुळे नक्की तक्रार कोणाकडे करायची हा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडत असतो. तरी विविध भागातील अधिकारी व कर्मचारी यांची त्वरीत बदल्या कराव्यात.

आता झाले ते खूप सहन केले यापुढे आम्ही हे सहन करणार नाही. आपला कारभार त्वरीत सुधारा अन्यथा गाठ ‘मनसे’ शी आहे. हे आपण लक्षात ठेवावे. नागरिकांच्या प्रश्‍नासाठी कोणतेही केस अंगावर घेण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागेपूढे पाहणार नाही याची नोंद घ्यावी.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top