सावेडी उपनगरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ.

Ahmednagar Breaking News
0

सावेडी उपनगरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ.

नगर,प्रतिनिधी.(09.एप्रिल.) : काल संध्याकाळी अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे सावेडी उपनगरासह जिल्ह्यात शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सावेडी उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात जोराच्या वाऱ्यांसह गारांचा पाऊस पडला. रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली.सावेडी भागातील रवी बारस्कर यांनी त्यांच्या गायीसाठी बांधलेले पत्र्याचे शेड पडले, सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.रस्त्यांवर लावलेले फ्लेक्सचे बोर्ड निखळून पडले.वीज महामंडळाच्या तारा तुटून पडल्या.त्यामुळे रात्रीपासून विविध भागात वीज पुरवठा बंद झाला आहे. रात्रीपासून वीज कामगार शर्तीचे प्रयत्न करून विविध भागातील तुटलेली झाडे बाजूला करून विद्युत तारा जोडायचे काम करत आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top