स्वाभिमानी असाल तर जनसेवा पॅनलला मतदान कराल. - खा.डॉ.सुजय विखे पाटील.
पारनेर,प्रतिनिधी. (25. एप्रिल.) : पारनेर तालुक्यातील जनता ही खूप स्वाभिमानी जनता आहे, ज्यांनी तुम्हाला कायम रडविले अशा लोकांसोबत जायचे की आपल्या भविष्यासाठी लढणाऱ्या सोबत राहायचे हे ठरविण्याची वेळ आली असून मला खात्री आहे की आपण योग्य तोच निर्णय घेवून जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून द्याल असा विश्वास खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. ते पारनेर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणूक प्रचार सभेत बोलत होते. यावेळी व्यापीठावर सुजित झावरे पाटील, विश्वनाथ कोरडे ,वसंत चेडे , राहुल शिंदे ,भाजप तालुकाध्यक्ष सुनील थोरात ,बंडू रोखले,माजी सभापती गणेश शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ते म्हणाले की या तालुक्यातील जनता ही एका दहशतीखाली कायम आहे, ही दहशत संपवायची असेल तर ही एक संधी तुम्हा सर्वांना आली असून या संधीचा तुम्ही फायदा उठवला तर या तालुक्याचे भविष्य आपण असे काही करू की तुम्ही विचार ही करू शकणार नाहीत.
तालुक्याचा विकास जो मागील तीन वर्षात वाळू तस्कर, गुंड , मटका किंग यांचा दावणीला बांधला होता तो तुमच्या पायाशी लोळण घालाण्यासाठी आम्ही सर्व ताकदीने प्रयत्न करू असे आश्वासन देताना खा. विखे म्हणाले की मागील तीन वर्षात खूप काही करण्याची संधी असताना केवळ ठेकेदार, वाळू माफिया, मटका किंग यांचे भले करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आपला वेळ घातला यांच्या उलट केवळ ९ च महिन्यात आम्ही या तालुक्याला पाच कोटींचा मोठा प्रकल्प देवून धनगर समाजाचे आयुष्याचे कल्याण केले, या प्रकल्पाने केवळ धनगर समाजाचेच नाहीतर सबंध तालुक्याचा विकास होणार आहे, विकासची दृष्टी ही विखे पाटील कुटुंबा कडे मागील पन्नास वर्षा पासून असून विखे पाटील कुटुंबाने कायम गोरगरीब जनतेच्या भल्यासाठी अहोरात्र सेवेचे व्रत घेतले आहे. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या संस्कारातून आमची जडणघडण झालेली असून आमच्यासाठी मायबाप जनताच महत्वाची आहे. आम्ही सत्तेत येताच जी दहशत होती तिचा बीमोड करण्याचे काम केले, कोणाचाही मुलाहिजा आम्ही बाळगला नाही, आता या तालुक्यातील जनतेला विचार करण्याची वेळ आली आहे, की ज्यांनी तुमच्या डोळ्यात अश्रू आणले त्यांच्या सोबत जायचे की जे तुमचे भविष्य घडविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत त्यांच्या सोबत जायचे. तुमचा चुकीचा एक निर्णय तुम्हाला अनेक वर्ष पुन्हा मागे घेवून जाईल तर तुमचे एक मत जनसेवा पॅनला टाकलेले हे तुमचे भविष्य घडविण्यासाठी ठरणारे आहे. माझा संघर्ष हा या तालुक्यातील जनतेच्या भल्यासाठी आहे. जो कायम राहणार असून यासाठी काहीही किंमत मोजण्याची तयारी ही आमची आहे. आपण सर्वांनी या निवडणुकीत आम्हाला म्हणजेच आपल्या भविष्याला साथ दिली तर येणारा काळ हा अत्यंत उज्वल असाच असणार असल्याची खात्री त्यांनी यावेळी दिली. या प्रचार सभेतून उपस्थित मतदारांना जनसेवा सहकारी पॅनला निवडून देण्याचे आवाहन या प्रसंगी त्यांनी केले.
या प्रचार सभेस ऋष्री गंधाडे, युवराज पठारे,भाऊ ठुबे, बंडू रोखले, सचिन वराळ , अश्विनी थोरात तसेच भाजपा शिवसेना शिंदेगट पदाधिकारी, चेअरमन, व्हा चेअरमन , संचालक वि.का.सो ,सरपंच उपसरपंच ग्रा पं सदस्य ,व्यापारी ,हमाल मापडी, मतदार, शेतकरी सभासद, यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.