CRPC कलम १४९ अन्वये सर्व सोशल मिडीया अहमदनगर जिल्हा ग्रुप ॲडमिन यांना नोटीस.
नगर, प्रतिनिधी. (19. एप्रिल.) : CRPC कलम 149 अन्वये सर्व सोशल मीडिया अहमदनगर जिल्हा ग्रुप ॲडमिन यांना सायबर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी त्यांना मिळालेल्या अधिकारांन्वये नोटीस देण्यात येते कि,
मी दिनेश आहेर पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन अहमदनगर मला CRPC कलम १४९ अन्वये मिळालेल्या अधिकारान्वये आपणास नोटीस देण्यात येते की, दिनांक २२/०४/२०२३ रोजी अहमदनगर जिल्हा हददीमध्ये रमजान ईद, अक्षय्य तृतीया उत्सव साजरा होणार आहे.तरी सदरचे उत्सव शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्याचे दृष्टीकोनातुन सोशल मिडीया जसे की ,What'sApp, Facebook, Instagram, Twitter इत्यादी माध्यमातून आक्षेपार्ह मजकुर टाकणाऱ्यावर पोलीस प्रशासनाच्या वतीने लक्ष ठेवण्यात येत आहे समाज कंटकाकडुन सोशल मिडियाचे माध्यमातुन चुकिचे संदेश व अफवा पसरविल्या जातात व त्यातुन दोन समाजात तेढ निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीसांचा सोशल मिडियावर वॉच राहणार असून अफवा पसरविणाऱ्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अहमदनगर शहर व अहमदनगर जिल्हयात गेल्या काही दिवसांमध्ये उत्सव प्रसंगी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे उद्देशाने आक्षेपार्ह संदेश / छायाचित्र / अफवा / खोटया बातम्या प्रसारीत करुन सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेत बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला असुन अशा समाजकंटकाविरुध्द पोलीस प्रशासनाचे वतीने कायदेशीर कारवाई देखील यापुर्वी करण्यात आलेली आहे.
दि.२२/०४/२०२३ रोजी चे रमजान ईद, अक्षय्य तृतीया उत्सव शांततेत व सुव्यस्थेत पार पाडण्याचे दृष्टिकोनातुन आपण आपले ग्रुपचे ॲडमिन असल्या कारणाने WhatsApp ला Only Admin Can Send Massage असे सेटिंग करुन आपले ग्रुप वरुन कोणत्याही प्रकारची अफवा किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचा मजकुर प्रसारित होणार नाही याची आपण अॅडमिन या नात्याने खबरदारी घ्यावी.
या उपरहि आम्ही आपणांस दिलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष करुन रमजान ईद, अक्षय्य तृतीया उत्सव प्रसंगी आपले ग्रुपचे सदस्यांकडुन कोणत्याही प्रकारची अफवा पसरविली जाईल किंवा दोन भिन्न जाती-जमाती मध्ये जातीय तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह संदेश / छायाचित्र / अफवा / खोटया बातम्या प्रसारीत केल्यास व त्यावरुन अहमदनगर शहर व जिल्हयात सार्वजनिक शांततेस व सुव्यवस्थेत बाधा निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपणांस व संबंधित व्यक्तीस ( मेसेज प्रसारित करणारा ) जबाबदार धरण्यात येवुन संबधिताविरुध्द प्रचलित कायदयानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. व सदरची नोटीस आपणांविरुध्द मा. न्यायालयात पुरावा म्हणुन सादर करण्यात येईल याची नोंद घ्यावी. सदरची नोटीस आज दि.१८/०४/२०२३ माझ्या सही व शिक्क्यानिशी जारी केली.