मनपा कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखात कायम पाठीशी.- नगरसेवक बाळासाहेब बोराटे.
नगर, प्रतिनिधी. (05. मे.) : महापालिका कर्मचारी रघुनाथ घोरपडे यांच्या कोरोनामध्ये झालेल्या निधनानंतर शासनाकडून मिळालेला 50 लाख रुपयांचा मदतीचा धनादेश रघुनाथ घोरपडे यांच्या पत्नी बेबीताई घोरपडे यांना नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते देण्यात आला.
गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोना काळात शासनाच्या आरोग्य विभागाने मोठी कामगिरी करून अनेकांचे प्राण वाचविले. या काळात मलेरिया विभागातील मनपा कर्मचारी रघुनाथ घोरपडे हे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांचे दुर्दैवी निधन झाले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्यानुसार सरकारी कर्मचारी यांना 50 लाख रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले होते. त्याचा पाठपुरावा करून घोरपडे यांच्या परिवाराला आज 50 लाख रुपयांचा धनादेश नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी विशाल वालकर,संदीप घोरपडे,सुभाष जगताप,भगवान जगताप,याकूब वडागळे,भारती वडागळे,राधा घोरपडे,ज्योती वराळ आदी उपस्थित होते.