नागरीक आणि व्यापारी यांनी न घाबरता आपले व्यवहार सुरळीतपणे सुरू करून या दहशतीला उतर द्यावे.- ना. राधाकृष्ण विखे पाटील.
शेवगाव ,प्रतिनिधी. (15. मे.) : शेवगाव येथील घटना अतिशय दुर्दैवी असून या घटनेची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे.यामध्ये दोषी असलेल्या व्यक्तिंवर कडक कारवाई करून यामागील मास्टर माईड शोधून काढण्यात पोलीस प्रशासन कुठेही कमी पडणार नाही.नागरीक आणि व्यापारी यांनी न घाबरता आपले व्यवहार सुरळीतपणे सुरू करून या दहशतीला उतर द्यावे, तुमच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे असल्याचा दिलासा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
शेवगाव येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मिरवणुकीवर झालेली दगडफेक आणि शहरात घडलेल्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेवून मंत्री विखे पाटील यांनी शेवगाव येथे येवून बाजारपेठेत घटना घडलेल्या भागात झालेल्या नूकसानीची पाहाणी केली.बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूतळ्यास पुष्पहार अर्पण करून धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. व्यापारी कार्यकर्ते यांच्याशी एकत्रितपणे संवाद साधला.त्यांचे म्हणणे जाणून घेतले.महीलामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने काही कुटूबियांना त्यांनी घरी जावून दिलासा दिला.
तहसिल कार्यालयात वरीष्ठ अधिकार्यांची बैठक घेवून बाजारपेठेतील अतिक्रमण,अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ति विरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत दिल्या.याप्रसंगी आ.मोनिका राजळे जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते नागरीक उपस्थित होते.
माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की, अतिशय नियोबध्द पध्दतीने घडवून आणलेल्या घटनेत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनास दिल्या असून आठ दिवसात अतिक्रमण,झेंडे,फ्लेक्स बोर्ड तातडीने काढून टाकवेत.शेवगाव मध्ये मावा आणि सुगंधी सुपारी मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर पुढे आल्याने याबातही प्रशासनाने गंभीर दखल घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
व्यापारी आणि कार्यकर्ते यांच्या बैठकीत बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,शहरातील कालची घटना अत्यंत दुर्दैवी असून याचे समर्थन होवू शकत नाही.या घटनेतील दोषीवर काय आणि कशी कारवाई करायची हे प्रशासन ठरवेल.त्यांना तुम्ही मदत करा.काही माहीती असेल तर द्या.शेवगावकरांचे सकंट हे आम्ही आमच्यावरचे संकट मानतो.यापुर्वी शहरात आशा घटना कधी घडल्या नव्हत्या.लहान मुलांचा वापर यामध्ये करण्यात आल्याचे आश्चर्य वाटत असल्याचे नमूद करून या दहशतीला मोडण्याचे काम प्रशासन करेल तुम्ही शांतता संयम ठेवला ही जमेची बाजू आहेच पण व्यवहार सुरू करून या दहशतीला उतर द्या असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.आ.मोनिका राजळे अरुण मुंढे आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी म्हणणे मांडले.