येत्या दहा दिवसांत संपूर्ण मागण्या मान्य होतील. - खा.डॉ.सुजय विखे पाटील.
शेवगाव,प्रतिनिधी. (17. मे.) : शेवगाव येथील दुर्घटनेचा आपण तीव्र शब्दात निषेध करत असून या घटनेतील आरोपींचा शोध पोलिस करत आहे, पुढील दहा दिवसात व्यापारी तसेच इतर सर्वांच्या मागण्या ह्या संपूर्ण मार्गी लागल्या असतील असा विश्वास खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी शेवगाव येथील व्यापारी असोसिएशनच्या शिष्टमंडळाची भेट घेवून दिला.
छत्रपती संभाजी राजे जयंतीच्या दिवशी झालेल्या दुर्घटने नंतर आज त्यांनी शेवगाव येथील दुर्घटनेचा आढावा पोलिस , व्यापारी तसेच प्रतिष्ठित नागरिक यांच्या कडून घेतला. यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांच्या अडचणी तसेच झालेल्या घटनेविषयी माहिती दिली. यावर खा. विखे यांनी पोलिस प्रशासन, व्यापारी आणि या घटनेशी संबंधित सर्व यंत्रणा यांची बैठक घेवून पुढील सूचना दिल्या.
बैठकीत झालेल्या चर्चे नंतर उपस्थित व्यापारी शिष्टमंडळ तसेच मान्यवरांना येत्या दहा दिवसात सर्व मागण्यांवर समाधानकारक उत्तर दिले जाईल असे आश्वासन दिले.पोलिस विभाग या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून आरोपीला तात्काळ अटक केले जाईल असे त्यांनी सांगितले.यावेळी नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ मुंढे ,बंडू रासणे, कमलेश गांधी, मयुर पिसाळ ,जगदिश शेट धूत ,आमोल सागडे ,नितीन दहीवाळकर ,चैतन्य देहळराय, तुषार पुरनाळेहे व्यापारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.